Shah Rukh Khan at Lalbaugcha Raja: किंग खान लालबागच्या राजाच्या चरणी, सुहानाच्या कपाळाचे कुंकू… व्हायरल व्हिडीओची चर्चा

Shah Rukh Khan at Lalbaugcha Raja: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कुटुंबीयांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला आहे. दरम्यान, सुहाना खानच्या कृतीने चाहत्यांनी मने जिंकली आहेत. आता तिने नेमकं काय केलं? जाणून घ्या...

Shah Rukh Khan at Lalbaugcha Raja: किंग खान लालबागच्या राजाच्या चरणी, सुहानाच्या कपाळाचे कुंकू... व्हायरल व्हिडीओची चर्चा
Suhana Khan
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 11:18 AM

गणेशोत्सवात संपूर्ण देशात लालबागच्या राजाची चर्चा असते. लाखो भाविक लालबागला दर्शनासाठी येतात. बॉलिवूडमधील अनेक कलाकार तसेच राजकारणी देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेताा दिसतात. काल बॉलिवूडचा किंग खान शाहरुख लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले. शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रशंसा केली आहे. किंग खान प्रत्येक धर्माचा आदर करतो. त्यामुळे अनेकदा लोक त्याची स्तुती करताना दिसतात. पण सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुहाना खानने जे काही केले आहे त्याची चर्चा सुरु आहे.

शाहरुख खानचे लालबागच्या राजाचे दर्शन घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या व्हिडीओमध्ये शाहरुख पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान यांच्यासोबत दिसत आहे. यावेळी आर्यन खान दिसला नाही, तसेच त्याचा लहान मुलगा अबरामही दिसला नाही. न्यूज एजन्सी ANI ने शाहरुखचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो बाप्पाचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्याने गणेशाच्या चरणी फुले अर्पण केली आणि पत्नीसोबत बाप्पाची आरतीही केली.

सुहानाच्या कृतीने वेधले लक्ष

दरम्यान, सुहाना खान ही लालबागच्या राजाचे दर्शन घेते आणि तेथील कुंक तिच्या कपाळाला लागते. ते कुंकू तिच्या डोळ्यात जाते. त्यामुळे ती ओढणी घेऊन ते पुसताना दिसते. पण अनेकांनी तिच्या या कृतीचा चुकीचा अर्थ काढला आहे. कुंकू डोळ्यात गेल्यामुळे सुहानाचा डोळा झोंबायला लागतो. ती तो ओढणीने पुसते. गौरी खान देखील तिला ते पुसण्यास मदत करते. पण सुहानाने कपाळाला लागलेले कुंकू पुसलेले नाही. तिने फक्त डोळ्यात गेलेले कुंकू पुसले आहे.

शाहरुख खान आणि गौरी यांच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर यावेळी गौरी पिवळ्या रंगाच्या सूट-सलवारमध्ये पारंपरिक लुकमध्ये दिसली. तर किंग खानने निळ्या रंगाचा कुर्त्या घातला आहे. दोघांचाही लूक छान वाटत आहे. तर सुहाना खानने बॉटल ग्रीन रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. चाहते सुहानाच्या कृतीचे कौतुक केले आहे.

घरात गणेश-लक्ष्मीची मूर्ती आणि कुराण एकत्र

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात गणेशाची आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. त्याच्या या बंगल्याची किंमत ३०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे आणि त्याचे घर एखाद्या महालापेक्षा कमी नाही. २००५ मध्ये आलेल्या ‘द इनर अँड आउटर वर्ल्ड ऑफ शाहरुख खान’ या डॉक्युमेंटरीमध्ये किंगच्या घरातील आतल्या बाजूचे फोटो दाखवण्यात आले होते. त्यात दाखवण्यात आले होते की त्याच्या घरात गणपती बाप्पा आणि लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवली होती, त्यासोबतच कुराण शरीफही ठेवले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us