ॲसिड हल्ल्याने पीडित महिलांसाठी शाहरुख खान याच्या चाहत्याचा मोठा निर्णय

| Updated on: Jan 25, 2023 | 9:41 AM

शाहरुख तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. म्हणून अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान किंग खानच्या या चाहत्याने घेतलेला निर्णय कौतुकास्पद

ॲसिड हल्ल्याने पीडित महिलांसाठी शाहरुख खान याच्या चाहत्याचा मोठा निर्णय
ॲसिड हल्ल्याने पीडित महिलांसाठी शाहरुख खान याच्या चाहत्याचा मोठा निर्णय
Follow us on

Shah Rukh Khan Pathaan Crazy Fans : अभिनेता शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील किंग खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहरुख याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये अभिनय करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता शाहरुख तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. म्हणून अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बुधवारी शाहरुखचा ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. जगभरात १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पठाण प्रदर्शित होणार आहे. अशात काही चाहत्यांनी खास अंदाजात आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाहरुख खान याच्या एका चाहत्याने ॲसिड हल्ल्याने पीडित असलेल्या महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पठाण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी मुंबई येथील एका व्यक्तीने मोठा निर्णय घेतला आहे. या व्यक्तीने G7 मल्टिप्लेक्सवर सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे सर्व तिकीट खरेदी केले आहेत. या व्यक्तीने अॅसिड हल्ल्याने पीडित महिलांना पठाण सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण सिनेमागृह बूक केला आहे.

अॅसिड हल्ल्याने पीडित महिलांसाठी मुंबईतील व्यक्तीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. याशिवाय किंग खानच्या या चाहत्याने शाहरुखच्या अन्य चाहत्यांना देखील पठाण सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी सिनेमागृहात काही सीट बूक केल्या आहेत. शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी अशी कामं केली आहेत, ज्यामुळे ते चर्चेत आहेत.

शाहरुख खान चार वर्षांनी पदार्पण करणार असल्यामुळे सिनेमागृहांबाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागणार आहेत. सांगायचं झालं तर, पठाण बुधवारी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच जवळपास ५० कोटी रुपयांच्या ॲडव्हान्स तिकीटांची विक्री केली आहे. रिपोर्टुनुसार आतापर्यंत पठाण सिनेमाचे जवळपास १३ लाख तिकीटांची विक्री झाली आहे.

मीडिया रिपोर्टने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४० कोटी रुपयांची कमाई करु शकतो. तर शनिवार आणि रविवारी सिनेमा भारतात तब्बल १५० ते २०० कोटी रुपयांपर्यंत गल्ला गोळा करु शकतो. पठाणमुळे वाद निर्माण झाल्याने याचा फायदा हा चित्रपटालाच होताना दिसत आहे. आता भारतामध्ये काय प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे