AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Hazare Trophy: 14 षटकारांसह सरफराज खानचं वादळी शतक, अर्जुन तेंडुलकरलाही सोडलं नाही

विजय हजारे ट्रॉफीतील चौथ्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. या सामन्यात मुंबई आणि गोवा हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात सरफराज खानचा झंझावात पाहायला मिळाला. यावेळी त्याने अर्जुन तेंडुलकरलाही सोडलं नाही.

Vijay Hazare Trophy: 14 षटकारांसह सरफराज खानचं वादळी शतक, अर्जुन तेंडुलकरलाही सोडलं नाही
14 षटकारांसह सरफराज खानचं वादळी शतक, अर्जुन तेंडुलकरलाही सोडलं नाहीImage Credit source: PTI
| Updated on: Dec 31, 2025 | 3:58 PM
Share

सरफराज खान टीम इंडिया आणि आयपीएल संघात स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेत होता. त्याच्या कष्टाचं चीज हे वर्ष संपता संपता झालं. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी पुन्हा मिळाली आहे. इतकंच काय तर विजय हजारे ट्रॉफीत त्याचा आक्रमक बाणा दिसून आला आहे. या वर्षाच्या शेवटही त्याने गोड केला आहे. सरफराज खानने गोव्याविरुद्धच्या सामन्यात खणखणीत शतक ठोकलं. यावेळी त्याचा सामना अर्जुन तेंडुलकरशी झाला. त्यालाही सरफराज खानने सोडलं नाही. सरफराज खानने 75 चेंडूत 157 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 209 पेक्षा जास्तीचा होता. या खेळीत त्याने 14 षटकार आणि 9 चौकार मारले. यावेळी त्याने 57 चेंडूतच शतकं पूर्ण केलं होतं. या शतकी खेळीत त्याने 8 षटकार मारले. त्यानंतरही त्याने झंझावात सुरु ठेवला आणि 150 पार धावा केल्या.

विजय हजारे ट्रॉफीत मुंबईच्या सरफराज खानने गोव्याच्या सहा गोलंदाजांचा सामना केला. यावेळी त्याने अर्जुन तेंडुलकरच्या सहा चेंडूंचा सामना केला. त्याने अर्जुनच्या सहा चेंडूंवर 11 धावा काढल्या. अर्जुन तेंडुलकरने एकूण 8 षटकं टाकली आणि 78 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. सरफराज खानने लिस्ट ए मध्ये ठोकलेलं हे तिसरं शतक आहे. विजय हजारे ट्रॉफीतील या पर्वात सरफराज खानने ठोकलेलं हे पहिलं शतकं आहे. यापूर्वी त्याने या पर्वात 55 धावांची खेळी केली होती. उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ही खेळी केली होती.

सरफराज खानच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाचं दार पुन्हा एकदा ठोठावलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड होऊ शकतं. या शतकामुळे त्याचा दावा आणखी मजबूत झाला आहे. सरफराज खानच्या या शतकी खेळीमुळे मुंबईने 50 षटकात 8 गडी गमवून 444 धावा केल्या आणि विजयासाठी 445 धावांचं आव्हान दिलं आहे. यात यशस्वी जयस्वालने 46, मुशीर खानने 60 आणि हार्दिक तामोरेने 53 धावांची खेळी केली. दरम्यान, या धावांचा पाठलाग करताना गोव्याचा डाव गडगडला. अर्जुन तेंडुलकर 24 धावा करून तंबूत परतला. गोव्याच्या 31 षटकात 4 गडी गमवून 164 धावा झाल्या होत्या.

मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.