Sharad Kapoor : व्हिडिओसाठी मला जबरदस्ती पैसे दिले अन्…शरद कपूरचा धक्कादायक दावा, काय म्हणाला?

Sharad Kapoor Post : अभिनेता शरद कपूरनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धक्कादायक दावा केला आहे.

Sharad Kapoor : व्हिडिओसाठी मला जबरदस्ती पैसे दिले अन्...शरद कपूरचा धक्कादायक दावा, काय म्हणाला?
| Updated on: Nov 17, 2026 | 4:28 PM

शाहरुख खानसोबत ‘जोश’ चित्रपटात काम केलेला अभिनेता शरद कपूरनं, ढासळत्या प्रकृतीमुळे नुकतंच बॉलिवूडकडे आर्थिक मदतीसाठी आणि कामासाठी आवाहन केलं होतं. यानंतर, सलमान खान आणि सोनू सूद यांनी अभिनेत्याला मदतीचा हात पुढे केला. आता, शरदनं एक धक्कादायक दावा केला आहे. त्याचा दावा आहे की, काही लोक सोशल मीडियावर कंटेंट तयार करण्यासाठी त्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत.

शरद कपूरचा धक्कादायक दावा

Loading...

मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, अभिनेत्यानं दावा केला आहे की, काही लोकांनी त्याच्याकडे पैसे घेऊन संपर्क साधला, बोलणं रेकॉर्ड केलं आणि नंतर पैसे काढून घेतले. या घटनांमुळे व्यथित झालेल्या शरदनं म्हटलं आहे की, तो यापुढे कोणालाही भेटणार नाही. व्हिडिओमध्ये, शरदनं चित्रपटसृष्टीतील, त्याच्या चाहत्यांचं आणि ज्यांनी त्याची प्रकृती जाणून त्याला मदत केली त्या सर्वांचे आभार मानले. मात्र, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या कंटेंटबद्दल त्यानं नाराजीही व्यक्त केली. व्हिडिओमध्ये शरद म्हणाला की, ‘चित्रपटसृष्टी आणि जे लोक माझी मनापासून काळजी घेतात, त्या सर्वांचा मी खूप आभारी आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं आहे की, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण सोशल मीडियावर खूप नकारात्मक गोष्टी दाखवल्या जात आहेत. पैसे दिले गेले. कोण काय करत आहे हे मला कळतही नाही. मला समजत नाही.’

 

अभिनेत्यानं आरोप केला आहे की, काही लोकांनी त्याच्या संमतीशिवाय त्याच्या हातात पैसे ठेवले, त्या घटनेचं शूटिंग केलं आणि नंतर ते पैसे परत घेतले. त्यानं असंही सांगितलं की, या घटनांनंतर तो लोकांना भेटणं थांबवेल.

शरदची मैत्रीण, ‘बेजुबान ट्रस्ट’शी संबंधित असलेल्या हेमा चौधरी यांनीही व्हिडिओ शेअर करत लोकांना आवाहन केलं आहे. शरद कपूरच्या प्रकृतीबद्दल लोकांना सर्वप्रथम हेमा यांनीच माहिती दिली होती. त्यांनी आता म्हटलं आहे की, शरदला त्रास देण्याऐवजी त्याला वैद्यकीय उपचार आणि प्रायव्हसीची गरज आहे. संस्थेनं त्याच्या नावानं चालणाऱ्या बनावट निधीसंदर्भातही इशारा दिला आहे.’

हेमा व्हिडिओमध्ये म्हणाल्या की, ‘शरदची प्रकृती ठीक नसल्यामुळे मला त्याची प्रकृती लोकांसमोर आणणं टाळायचं होतं. तो काय बोलतोय हे त्याला स्वतःलाच कळत नाही. त्या दिवशी, जेव्हा मी मदतीसाठी आवाहन केलं, तेव्हा लोकांनी मला ट्रोल केलं.’ हा व्हिडिओ शेअर करत हेमानं लिहिलं की, ‘कृपया, शरदला त्याचं आयुष्य जगू द्या… देणगीचे व्हिडिओ बनवणं थांबवा.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us