Sharat Saxena Health Update : शरत सक्सेना यांच्यावर 6 तासांची स्पाइन सर्जरी; आता प्रकृती कशी ?
बॉलिवूड अभिनेते शरत सक्सेना यांची 6 तासांची स्पाइन सर्जरी यशस्वी झाली असून, ते आता बरे होत आहेत. चालताना होणारा त्रास आता थांबला आहे असे सांगत त्यांनी रुग्णालयातील आणि घरी परतल्यानंतरचे फोटो शेअर केले.

Sharat Saxena Health Update : ‘मिस्टर इंडिया’, ‘गुलाम’, ‘बजरंगी भाईजान’ यासह बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत झळकलेले अभिनेत शरत सक्सेना यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. चालणं-फिरण्यातही त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. याबद्दल त्यांनी स्वत: माहिती दिली होती. तब्येतीच्या तक्रारीनंतर आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सक्सेना यांनी मणक्याची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. विशेष म्हणजे तब्बल 6 तास हे ऑपरेशन सुरू होतं. या शस्त्रक्रियेनंतर खुद्द शरत सक्सेना यांनीच सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील काही फोटो शेअर करत आपल्या तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली.
शरत सक्सेना यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते रुग्णालयातील बेडवर झोपलेले दिसत आहेत. “ 6 तासांची स्पाइन सर्जरी पूर्ण झाली. एका चांगल्या माणसाला कोणीही थांबवू शकत नाही.” असं त्यांनी यासोबत लिहीलं. त्यांच्या या पोस्टवरून त्यांच्यावर तब्बल 6 तास शस्त्रक्रिया झाल्याचे स्पष्ट झालं. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर शरत सक्सेना यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. कडून शरत सक्सेना यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
लवकरं बरे व्हा, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
अभिनेते शरत सक्सेना यांनी सोशल मीडियावर रुग्णालयातील तसेच घरी परततानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं दिसून आलं. त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोसोबत शरत यांनी “ आता आणखी सूप प्यावं लागणार नाही”, असे मजेशीर अंदाजात लिहीलं. तर दुसऱ्या फोटोसोबत “नो मोअर वॉकिंग स्टिक” असं म्हणत आता चालण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागणार नसल्याचे त्यांनी सांगितलं. त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, शरत सक्सेना लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, यासाठी चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
यापूर्वी शरत सक्सेना यांनीच इन्स्टाग्रामवर एमआरआय तपासणीचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून चाहते मात्र चांगलेच चिंतेत पडले होते. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीबाबत प्रश्नही विचारले होते. मात्र, आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून ते बरे होताना दिसत आहेत.
रोज करतात वर्कआऊट
शरत सक्सेना हे बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि दिग्गज कलाकार आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. वयाच्या 76 व्या वर्षीही ते आपल्या फिटनेसबाबत अत्यंत जागरूक आहेत. शरत सक्सेना दररोज व्यायाम करतात. जवळपास दोन तास ते फिटनेस ट्रेनिंग घेतात. त्यामुळे या वयातही त्यांची शरीरयष्टी आणि फिटनेस पाहून अनेक लोकं आश्चर्यचकित होतात. त्यांच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असते.