AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apurva Nemlekar | नवी मालिका नाही, तर ‘या’ कारणामुळे ‘शेवंता’ने घेतला ‘पम्मी’चा निरोप!

‘शेवंता’ साकारून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या अपूर्वाला ‘रात्रीस खेळ चाले 2’ ऑफ एअर जाताच ‘तुझं माझं जमतंय’ ही नवी मालिका मिळाली होती.

Apurva Nemlekar | नवी मालिका नाही, तर ‘या’ कारणामुळे ‘शेवंता’ने घेतला ‘पम्मी’चा निरोप!
अपूर्वा नेमळेकर
| Updated on: Feb 24, 2021 | 3:28 PM
Share

मुंबई : मालिका विश्वात पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे आगमन होत आहे. याच निमित्ताने मालिकेतील ‘अण्णा’, ‘शेवंता’ आणि ‘माई’ ही मुख्य पात्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. यातही ‘शेवंता’ साकारात घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या अधिक चर्चेत आहे. अपूर्वा सध्या ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा साकारत होती. मात्र, अचानक तिने ही मालिका सोडल्याने तिच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला आहे (Shevanta fame Actress Apurva Nemlekar quite pammi character from tujha majha jamtay serial).

प्रसिद्ध मराठी वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतंय’ ही मालिका चांगलीच प्रसिद्धीस आलेली पहायला मिळली होती. एकीकडे या मालिकेला सुरू होऊन काही महिने देखील लोटळे नसताना, या मालिकेत हळूहळू मोठे बदल घडल्याचे पहायला मिळत आहेत.

‘शेवंता’ झाली ‘पम्मी’!

‘शेवंता’ साकारून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या अपूर्वाला ‘रात्रीस खेळ चाले 2’ ऑफ एअर जाताच ‘तुझं माझं जमतंय’ ही नवी मालिका मिळाली होती. मालिकेत मनोरंजनाचा आणि ग्लॅमरचा तडका देण्यासाठी असलेली ‘पम्मी’ ही व्यक्तीरेखा अपूर्वाने साकारली होती. ही मालिका सुरू होऊन काही महिने उलटतात न उलटतात तोच आता अपूर्वाने म्हणजेच जनमनात स्थान पटकावलेल्या ‘शेवंता’ने ही मालिका सोडत, ‘पम्मी’ला बाय-बाय म्हणण्याचा निर्णय घेतला आहे.

‘रात्रीस खेळ चाले’चे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने पुन्हा एकदा ‘शेवंता’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच कारणामुळे अपूर्वाने ही मालिका सोडली असल्यचे बोलले जात होते. याची इतरही अनेक कारणं चर्चिली जात होती. चित्रीकरणाच्या काही तारखा जुळत नसल्याचे देखील बोलले जात होते. मात्र, या सगळ्या दाव्यांना धुडकावून लावत अपूर्वाने खरे कारण सांगितले आहे (Shevanta fame Actress Apurva Nemlekar quite pammi character from tujha majha jamtay serial).

‘या’ कारणामुळे सोडली मालिका!

सध्या व्यस्त शेड्युलमुळे स्वतःला वेळ देता येत नव्हता. या सगळ्या धावपळीत एखाद्या ब्रेकची गरज होती. आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे ही मालिका सोडत असल्याचे, अपूर्वाने म्हटले आहे.

‘ही’ अभिनेत्री साकारतेय ‘पम्मी’

अपूर्वाने ‘पम्मी’ला निरोप दिल्यानंतर आता अभिनेत्री प्रतिक्षा जाधव ही भूमिका सकारात आहे. ‘झी मराठी’वरील ‘देवमाणूस’ या मालिकेतील मंजुळाच्या भूमिकेतून अभिनेत्री प्रतीक्षा जाधव महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. तिची ‘मंजुळा’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे ‘पम्मी म्हणून देखील प्रतिक्षा प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकू शकेल, असे म्हटले जात आहे.

‘रात्रीस खेळ चाले 3’ची प्रेक्षकांना उत्सुकता!

प्रचंड गाजलेली मालिका ‘रात्रीस खेळ चाले’चे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या दोन पर्वांमधील कथांमुळे आता तिसऱ्या पर्वात नक्की काय कथा असणार, याबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. मात्र, पुन्हा एकदा तिच सगळी जुनी पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, हे नक्की झालं आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी कलाकारांना कोकणातील गावातच मुक्काम करावा लागतो, अशा परीस्थित मुंबईतील चित्रीकरण आणि कोकणातील चित्रीकरण ही तारेवारीच कसरत करावी लागू नये, यासाठीच अपूर्वाने ‘पम्मी’ची व्यक्तिरेखा सोडल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे काही नसून कुठलेही हेवेदावे न ठेवता केवळ स्वतःसाठी यातून अपूर्वाने ब्रेक घेतला आहे.

(Shevanta fame Actress Apurva Nemlekar quite pammi character from tujha majha jamtay serial)

हेही वाचा :

Marathi Movie | दोन मित्रांच्या मैत्रीची अनोखी कथा, ‘रूप नगर के चीते’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Rakhi Sawant | ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या राखीवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.