बळजबरीचे किसिंग सीन, नुसतं अंगप्रदर्शन..; ‘पेद्दी’मधील जान्हवी कपूरच्या सीन्सवरून मोठा वाद, भडकली गायिका
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पेद्दी' या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूरच्या भूमिकेचं ज्या पद्धतीने चित्रण केलं आहे, ते पाहून नेटकरी संतापले आहेत. चित्रपटात तिच्या भूमिकेचा वापर फक्त अंगप्रदर्शनासाठी केल्याची टीका अनेकांनी केली आहे.

साऊथ सुपरस्टार रामचरणची मुख्य भूमिका असलेला ‘पेद्दी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. मात्र यामागचं कारण अभिनेत्री जान्हवी कपूर आहे. या चित्रपटात जान्हवीच्या भूमिकेला अभिनयाच्या दृष्टीने फारसा वाव दिला नसून फक्त अंगप्रदर्शनापुरता तिचा वापर केल्याचा आरोप दिग्दर्शकांवर होत आहे. दिग्दर्शक बुची बाबू सनावर नेटकरी प्रचंड टीका करत आहेत. चित्रपटात जान्हवीचा वापर फक्त एखाद्या ‘प्रॉप’सारखा (वस्तू) केला असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. यावर आता प्रसिद्ध गायिका सुमंगली अरियानायमगनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुमंगलीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, ‘शक्तिशाली पुरुषांनी भरलेल्या एका खोलीत बसून असुरक्षिततेच्या वेदनेवर एक कथा लिहिली गेली. पण त्याच वेळी त्यांनी जान्हवी कपूरच्या पात्राला केवळ कॅमेऱ्यासाठी एक शरीर, जबरदस्तीच्या चुंबनासाठी एक साधन आणि गाणं संपल्यावर फेकून देण्याचं एक उपकरण बनवून टाकलंय. या दिग्दर्शकांना मानवी प्रतिष्ठा आणि आदर म्हणजे काय हे चांगलंच ठाऊक होतं, पण त्यांनी सहजच ठरवलं की जान्हवी त्यास पात्र नाही.’
गायिकेची पोस्ट-
Singer Sumangaly speaks out against Janhvi’s character in Peddi
by
u/DragonDeninSharkTank in
BollyBlindsNGossip
‘पेद्दी’ या चित्रपटात जान्हवी कपूरने अचियम्मा नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक आणि समिक्षकांनी आरोप केला की, जान्हवीच्या अभिनयावर किंवा तिच्या कलेवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी कॅमेरा अनेकदा तिच्या छाती, कंबर आणि फिगरवर अधिकाधिक केंद्रीत होता. चित्रपटात अनेक ठिकाणी तिचे असे शॉट्स दाखवण्यात आले आहेत, जे पूर्णपणे ‘ऑब्जेक्टिफाय’ केलेले (स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणून दाखवणं) दिसतात. एका दृश्यात तर ‘पेद्दी’च्या भूमिकेतला रामचरण स्वत:च तिच्याशी गैरवर्तन करतो, तेव्हा ही मर्यादाच ओलांडली जाते. यामुळे अनेकांनी दिग्दर्शक बुची बाबू सना आणि निर्मात्यांच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
After watching Peddi, you can’t help but feel pity for Janhvi Kapoor. Sridevi would have never allowed her to act in such B-grade films in the South.#Peddi #PeddiReview #JanhviKapoor pic.twitter.com/F2beJEGaYl
— 𝐳𝐚𝐲𝐝 (@MaheshFallout) June 4, 2026
या सर्व टीकेदरम्यान एका इन्स्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉटसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये जान्हवी कपूरच्या भूमिकेचं वर्ण कोणत्याही अभिनेत्रीसाठी ‘सर्वांत महागडा अपमान’ असं करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे जान्हवीने स्वत: या पोस्टला लाइक केलं आहे. या पोस्टमध्ये असाही दावा केलाय की जान्हवीने हे सर्व मुकाट्याने सहन केलं नाही. तिने पोस्ट प्रॉडक्शनदरम्यान तिने जेव्हा हे शॉट्स पाहिले, तेव्हा त्यावर स्पष्टपणे आक्षेप घेतला होता.