AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smita Jaykar : तिला कचऱ्यासारखी वागणूक…सुभाष घई यांच्या अफेअरबद्दल मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य

Smita Jaykar On Shubhash Ghai : मराठी अभिनेत्री स्मिता जयकर यांनी एका मुलाखतीत सुभाष घई आणि महिमा चौधरी यांच्या अफेअरबद्दल भाष्य केलं आहे.

Smita Jaykar : तिला कचऱ्यासारखी वागणूक...सुभाष घई यांच्या अफेअरबद्दल मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य
| Updated on: Oct 24, 2026 | 7:35 AM
Share

एकेकाळी महिमा चौधरी आणि सुभाष घई यांच्या अफेअरच्या चर्चा झालेल्या. २९ वर्षांपूर्वी, १९९७ मध्ये, ‘परदेस’ या चित्रपटामुळे महिमा चित्रपट चाहत्यांमध्ये रातोरात प्रसिद्ध झाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष घई यांनी केलं होतं आणि सिनेमाच्या यशानंतर सुभाष घई आणि महिमा चौधरी यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरू लागल्या. या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री स्मिता जयकर यांनी या प्रकरणी आपलं मत मांडलं आहे.

काय म्हणाल्या स्मिता जयकर?

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत स्मिता जयकर यांना ‘परदेस’ चित्रपट आणि महिमा चौधरी यांच्याभोवतीच्या वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, अभिनेत्रीनं सांगितलं की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचा महिमासोबत फारसा संवाद झाला नव्हता.

महिमा चौधरी आणि सुभाष घई एकमेकांच्या खूप जवळ असल्याची अफवा पसरली होती. स्मिता जयकर यांनी असंही सांगितलं की, सेटवर असं काहीही त्यांनी पाहिलं नाही, जे नंतर चर्चेचा विषय बनलं. स्मिता यांनी सांगितलं की, त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये महिमा चौधरी आणि सुभाष घई एकमेकांच्या खूप जवळ असल्याची चर्चा होती. पण, त्यांच्या नात्याबद्दल फारसं काही माहित नसल्याचंही स्मिता यांनी सांगितलं.

स्मिता म्हणाल्या की, ‘महिमाला या नात्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि तिनं त्यात स्वतःला खूप गुंतवलं होतं. जेव्हा एखादी स्त्री नात्यात पूर्णपणे गुंतते आणि नंतर तिला नकार मिळतो, तेव्हा ती भावनिकदृष्ट्या खचू शकते. मला वाटतं की, जेव्हा एखादी स्त्री नात्यात सर्वस्व देते आणि एके दिवशी पुरुष तिला कचऱ्यासारखी वागणूक देऊन फेकून देतो, तेव्हा ती खचून जाते.’

‘सर्वजण म्हणायचे की, महिमा चौधरी आणि सुभाष घई यांचं अफेअर होते, पण ते खरं आहे की, नाही हे मला माहीत नाही. पण जेव्हा गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत, तेव्हा शक्य आहे की, ती मानसिक आघातात होती आणि तिनं ते सर्व बोलून टाकलं.’ असंही स्मिता म्हणाल्या.

दरम्यान, महिमा चौधरीनं यापूर्वी सुभाष घई यांच्यासोबतच्या तिच्या वादांबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्रीनं आरोप केला होता की ‘परदेस’ चित्रपटानंतर तिच्यात आणि सुभाष घई यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. महिमा म्हणाली की, या वादामुळे तिला काही सिनेमे मिळाले नाहीत. तिनं असाही दावा केला की, राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ या चित्रपटात काम करण्याची संधी तिनं गमावली.

सुभाष घई यांनी यापूर्वी या आरोपांना उत्तर देताना म्हटलं होतं की, ‘परदेस’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्यात एक किरकोळ वाद झाला होता. त्यांच्या कंपनीनं महिमाला एका कराराच्या बाबीसंदर्भात नोटीस पाठवली होती, परंतु नंतर मतभेद मिटले आणि त्यांच्यात कोणताही वाद नाही.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…