एकेकाळी हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसायची सलमानची हिरोईन; आज ओळखूही येईना

या अभिनेत्रीने करिअरच्या सुरुवातीला सलमान खानसोबत काम केलं होतं. तिच्या दिसण्याची तुलना ऐश्वर्या रायशी केली जात होती. आता तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

एकेकाळी हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसायची सलमानची हिरोईन; आज ओळखूही येईना
सलमान खान, स्नेहा उल्लाल
| Updated on: Oct 01, 2026 | 10:08 AM

सलमान खानसोबत ‘लकी : नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. स्नेहा सध्या बिहारमधील गया इथं तिच्या आगामी ‘अर्धनायक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी ती ग्रामीण भागात राहून तिथलं वातावरण, लोकांचं जीवन आणि त्यांच्या परंपरा जवळून समजून घेत आहे. बिहारमधील लोकांच्या आपुलकीने स्नेहा प्रभावित झाली असून, तिने स्थानिक नागरिकांचं भरभरून कौतुक केलं आहे. बिहारमधील शूटिंगदरम्यानचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये ती ओळखूही येत नसल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

एकेकाळी स्नेहाच्या दिसण्याची, सौंदर्याची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत व्हायची. तिचे डोळे, तिचं दिसणं हुबेहूब ऐश्वर्यासारखंच असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या होत्या. त्यामुळे आता तिचा बदललेला लूक पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. दरम्यान गयामध्ये शूटिंगचा अनुभव सांगताना स्नेहाने स्थानिक लोकांच्या स्वभावाचं कौतुक केलं. तिने सांगितलं की, सुरुवातीला बिहारमधील लोकांबद्दल तिला फारशी माहिती नव्हती. मात्र, शूटिंगच्या निमित्ताने त्यांच्यासोबत वेळ घालवल्यानंतर त्यांचा स्वभाव आणि आपुलकी जवळून अनुभवता आली. इथले लोक अतिशय प्रेमळ आणि मनाने मऊ आहेत, असं स्नेहाने म्हटलं.

Loading...

पहा फोटो-

स्नेहाचा स्थानिक महिलांसोबतचा सहज वावरही पाहायला मिळत आहे. ती गावातील महिलांसोबत जमिनीवर बसून गप्पा मारतेय, त्यांचं दैनंदिन जीवन समजून घेत आहे आणि त्यांच्या परंपरांविषयी जाणून घेत आहे. त्यामुळे शूटिंगसोबतच तिची या भागातील लोकांशी चांगली मैत्रीही होत आहे. स्नेहा याआधी पटणाला गेली आहे. मात्र, गयामध्ये येण्याची आणि तिथे चित्रपटाचं शूटिंग करण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. या अनुभवाबद्दल बोलताना तिने सांगितलं की, स्थानिक लोकांचा साधेपणा आणि आपुलकी तिला विशेष आवडली.

स्नेहाने यावेळी तिच्या सुरुवातीच्या अभिनय प्रवासाचीही आठवण सांगितली. तिच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी ती खूपच लहान आणि अभिनयाच्या क्षेत्रात नवीन होती. त्या काळात दिग्दर्शक आणि सहकलाकार जसं सांगायचे, तसंच करण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं तिने सांगितलं. ‘अर्धनायक’मध्ये स्नेहा लालमुनिया देवी नावाच्या ग्रामीण महिलेची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा 1950च्या दशकातील ग्रामीण समाजाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी गावातील महिलांच्या आयुष्याचा जवळून अभ्यास करणं स्नेहासाठी महत्त्वाचं ठरत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us