Sonakshi Sinha -Zaheer Iqbal : लग्नाला 2 वर्ष होत नाहीत तोच जहीर इक्बालने केला असा सवाल; सोनाक्षी सिन्हाचा चेहराच पडला..
Sonakshi Sinha Zaheer Iqbal: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. अनेकदा ते मजेशीर फोटो, व्हिडीओही अकाऊंटवर शेअर करत असतात.

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Video : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मोठ्या पडद्यावर सध्या फार सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर तर चांगलीच ॲक्टिव्ह असते. सोनाक्षी आणि तिचा पती जहीर इक्बाल यांची जोडी खूप लोकप्रिया आहे. सोशल मीडियावर, त्यांच्या अकाऊंटवरही ते अनेकदा फोटो, मजेशीर व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या आंतरधर्मीय लग्नावरून अनेकदा त्यांतं ट्रोलिंग होतं, ऐकून घ्यावं लागतं, पण ते दोघेही तोडीस तोड प्रत्युत्तर देऊन समोरच्याला शांत करतात.
सध्या सोशल मीडिावर ‘मेलोडी’ मीमची धमाल सुरू आहे. मजेशीर कोट्स आणि व्हिडीओजसाठी प्रसिद्ध असलेला जहीर इक्बालही या थीममापसून कसा मागे हटेल बरं ? झहीर इक्बाल हा अनेकदा सोनाक्षी सिन्हाच्या खोड्या काढत असतो. त्याचे काही मजेशीर व्हिडीओही समोर आले आहेत. आता मेलोडी थीमवरूनही त्याने अशीच काहीशी मजा केली आहे. सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल यांनीही त्यांच्या खास शैलीत हा ट्रेंड स्वीकारला असून, त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला आहे. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या या व्हिडिओला प्रचंड लाईक्स आणि प्रशंसा मिळत आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या आगामी ‘सिस्टम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी काल,एका जॉईंट पोस्टमध्ये ही मजेशीर क्लिप शेअर केली. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे माहीत आहे का, झहीर इक्बाल सोनाक्षी सिन्हाला असं या व्हिडिओमध्ये विचारताना दिसला. मात्र त्यावरसोनाक्षी सिन्हाने नकारार्थी उत्तर दिलं. यानंतर झहीर इक्बालच्या कृतीने सर्वांना हसू फुटलं.
जहीर इक्बालची नवी मजा
व्हिडिओमध्ये, सोनाक्षीने झहीरला विचारलं, “तुला काय विचारायचं आहे?” त्यावर झहीरने उत्तर दिलं, “माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहीत आहे का ?” त्यावर सोनाक्षी गंमतीने म्हणली “नाही, सांग ना.. ?.” काही क्षणांनंतर, झहीरने ‘मेलडी’ चॉकलेट बाहेर काढलं आणि तो म्हणाला, “मेलडी खाओ, खुद जान जाओ”. ते उत्तर ऐकून सोनाक्षीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. नंतर सोनाक्षीने गंमतीने ती कॅंडी त्याच्याकडे परत फेकून दिली.
लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया..
हा व्हिडिओ समोर येताच, सोशल मीडिया युजर्समुळे तो प्रचंड व्हायरल झालाय. काही तासांतच, त्या रीलला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. चाहत्यांनी या कपलच्या विनोदी टायमिंगचे कौतुक केले. अनेकांच्या मते, व्हायरल ट्रेंडची नक्कल करण्याऐवजी, या दोघांनी त्यात स्वतःचा एक अनोखा ट्विस्ट दिला, आणि हेच लोकांना खूप आवडला.
सोनाक्षी सिन्हाने जून 2024 मध्ये झहीर इक्बालशी लग्न केलं. तेव्हापासून ते अनेक फोटो शेअर करत असतात. त्यांची जोडी, मजेशीर व्हिडीओ लोकांना खूप आवडतात.