AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonali Kulkarni : साडी नेसायला सांगितली, अंधाऱ्या खोलीत बोलावलं…सोनाली कुलकर्णीनं सांगितला कास्टिंगचा धक्कादायक अनुभव

Sonali Kulkarni On Casting : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकत्याच एका मुलाखतीत कास्टिंगचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

Sonali Kulkarni : साडी नेसायला सांगितली, अंधाऱ्या खोलीत बोलावलं...सोनाली कुलकर्णीनं सांगितला कास्टिंगचा धक्कादायक अनुभव
| Updated on: Oct 17, 2026 | 3:33 PM
Share

इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री कास्टिंग काउचला बळी पडल्या आहेत. काही जणी या जाळ्यात अडकल्या, तर काहींनी शहाणपण दाखवून स्वतःला त्यातून सोडवलं. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला तिच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंगचा एक वाईट अनुभव आला होता. याबद्दल सोनालीनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. सोनाली कुलकर्णीनं आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीनं मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतही अभिनयाची छाप पाडली आहे.

सोनाली कुलकर्णीनं सांगितला धक्कादायक अनुभव

सोनालीनं ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. सोनाली म्हणाली की, ‘एकदा सेक्रेटरीनं मला सांगितलं की, दिग्दर्शकानं मला साडी नेसून बोलावलं आहे. यानं मला धक्काच बसला. मी विचारलं, ते माझी कथा ऐकणार आहेत, मग मला साडी नेसायची काय गरज आहे? त्यांनी मला एका बिल्डिंगमध्ये बोलावलं होतं. त्यांनी तिथे एक बनावट सेटअप तयार केला होता. तिथे एक टेबल आणि दोन खुर्च्या होत्या. ते म्हणाले, ‘कथा सांगण्यासाठी तुम्हाला आत यावं लागेल. मला वाटलं की, आत एक ऑफिस असेल. पण, त्या खोलीत खूप अंधार होता. मी आत जाताच, तिथं काहीच नव्हतं, फक्त एक पलंग होता. हे पाहून मला धक्का बसला. मला खूप अस्वस्थ वाटलं.’

‘मी त्यांना काहीही न बोलता निघून गेले. नंतर माझ्या लक्षात आलं की, तो चित्रपट दुसऱ्या कोणासोबत तरी पूर्ण झाला होता. त्या दिग्दर्शकासोबत काम केलेल्या प्रत्येक कलाकाराबद्दल मला खूप वाईट वाटलं. मला वाटतं की, तुम्ही तुमच्या इंट्युशनवर विश्वास ठेवला पाहिजे.’ असंही सोनाली पुढे म्हणाली.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं ‘द पॅराडाईज’, ‘दिल चाहता है’, ‘मिशन काश्मीर’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘सिंघम’ आणि ‘चंदू चॅम्पियन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदी व्यतिरिक्त, ती मराठी चित्रपटांमध्येही दिसली आहे. सोनालीनं टीव्ही इंडस्ट्रीमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला