हातात जळता दिवा घेऊन अक्षय कुमारने केलेलं शूटिंग, गाणं ठरलेलं प्रचंड सुपरहिट, आजही वेळ काढून लोक ऐकतात

सोनू निगम यांचं 27 वर्षांपूर्वींचं गाणं, हातात जळता दिवा घेऊन अक्षय कुमार पोहोचलेला मां शेरावालीच्या मंदिरात. आजही हे गाणं चाहते प्रचंड आवडीने ऐकतात.

हातात जळता दिवा घेऊन अक्षय कुमारने केलेलं शूटिंग, गाणं ठरलेलं प्रचंड सुपरहिट, आजही वेळ काढून लोक ऐकतात
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 04, 2026 | 2:14 PM

90 च्या दशकातील लोकप्रिय गायकांमध्ये सोनू निगम यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. रोमँटिक गाण्यांना आपल्या सुरेल आवाजाने वेगळी ओळख देणाऱ्या सोनू निगम यांनी भक्तिगीतांनाही आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजातील असंच एक 27 वर्षं जुनं माता राणीचं गाणं आजही श्रोत्यांच्या पसंतीस उतरते. विशेष म्हणजे या गाण्यात अभिनेता अक्षय कुमारचा भक्तिभावाने भरलेला अंदाजही पाहायला मिळतो.

सोनू निगम यांच्या आवाजातील हे गाणं 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, सैफ अली खान आणि माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत होते. ‘जय माता दी, जय माता दी’ असे बोल असलेलं हे गाणं अक्षय कुमारवर चित्रित करण्यात आलं आहे.

Loading...

हातात ज्योत घेऊन अक्षय कुमारची भावूक भूमिका

‘जय माता दी’ हे गाणं अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलं असून आनंद बक्षी यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. चित्रपटाच्या कथानकात अक्षय कुमारच्या व्यक्तिरेखेला जेव्हा माधुरी दीक्षितच्या व्यक्तिरेखेने सैफ अली खानच्या व्यक्तिरेखेशी लग्न केल्याचं समजतं तेव्हा तो भावनिक होतो. त्यानंतर हातात माता राणीची ज्योत घेऊन तो मां शेरावालीच्या चरणी जातो. या प्रसंगातील अक्षय कुमारचा भक्तिभाव आणि भावनिक अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.

‘हे माई मेरी सच्चियां, जोता वाली माता, तेरी सदा ही जय…’ आणि ‘दुनिया से दूर जा रहा हूं, मां मैं तेरे पास आ रहा हूं’ असे या गाण्याचे बोल आहेत. सोनू निगम यांच्या दमदार आवाजामुळे या भक्तिगीताला वेगळीच उंची मिळाली आहे.

नवरात्रीच्या दिवसांत हे गाणं आजही अनेक ठिकाणी ऐकायला मिळतं. सोशल मीडियावरही या गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला जातो. गाणं ऐकताना चाहते अक्षय कुमारच्या अभिनयाचं कौतुक करण्यासोबतच कमेंटमध्ये ‘जय माता दी’ लिहिताना दिसतात. त्यामुळे 27 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही भक्तांच्या आणि संगीतप्रेमींच्या मनात आपलं स्थान टिकवून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us