घरातील कुराण-गीता कधीच..; सोनू सूदचा डोळ्यात अंजन घालणारा Video, म्हणाला “आताच सुधरा..”

Sonu Sood on Gita And Quran: धर्मावर सर्वत्र वाद सुरु असताना सोनू सूदची झोप उडवणारी पोस्ट... घरात असलेल्या गीता आणि कुराणचा उल्लेख करत अभिनेता म्हणाला, 'माणसा सुधर अद्यापही वेळ गेलेली नाही...', सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा...

घरातील कुराण-गीता कधीच..; सोनू सूदचा डोळ्यात अंजन घालणारा Video, म्हणाला आताच सुधरा..
| Updated on: Feb 25, 2026 | 2:00 PM

Sonu Sood on Gita And Quran: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद फक्त लोकप्रिय अभिनेता नाही तर, गरजू लोकांचा देवदूत देखील आहे. अभिनेत्याने आजपर्यंत अनेकांची मदत केली. आजही अभिनेता लोकांच्या मदतासाठी धवतो. पण आता, अभिनेत्याने धर्मावर मोठं वक्तव्य केलं आहे. घरात असलेल्या गीता आणि कुराणचा उल्लेख करत अभिनेत्याने लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. घरात ठेवलेली गीता आणि कुराण कधीच एकमेकांसोबत भांडत नाही, पण लोकं त्यासाठी भांडतात… जी त्यांनी कधी वाचलीच नाही… अभिनेत्याच्या या व्हिडीओवर अनेकांना प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनू सूद यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला, ‘कधी विचार केलाय दारू विकणाऱ्याला कधीच कुठे जावं लागत नाही, पण दूध विकणाऱ्या प्रत्येक गल्लीत फिरावं लागतं… दूध विक्रेत्याला आपण विचारतो दुधात पाणी तर नाही टाकलंय ना? आणि दारुत मात्र पाणी टाकून पितो… मिठाप्रमाणे कडू बोलणारा कायम आपला मित्र असतो. त्यामुळे मिठाला कधीच किड लागत नाही आणि मिठाईवर किडे लगेच येतात…

अभिनेता पुढे म्हणतो, ‘कधी तुम्ही विचार केलात ज्या फोटोचं आपण कौतुक करतो, त्या फोटोचा भार तर एका खिळ्याने उचललेला असतो, ज्याला आपण कायम विसरतो… मेणबत्ती पेटवून आपण मृत व्यक्तीला आठवतो आणि वाढदिवशी मेणबत्ती विझवतो… पैंजणांची किंमत हजारोंमध्ये असते, पण त्याची जागा मात्र पायात असते. टिकलीची किंमत 1 रुपये असते, पण ती कपाळावर लावली जाते… हा असा काळ आहे, जेथे घरात ठेवलेली गीता आणि कुराण एकमेकांसोबत कधीच भांडत नाही. पण लोकं भांडतात, ज्यांनी ती कधी वाचलेलीच नासते… वाह माणसा… सुधर… अद्यापही वेळ गेलेली नाही….’, सध्या अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

सोशल मीडियावर अनेक सुने सूनचा व्हिडीओ पाहिला ऐकला… आतापर्यंत या व्हिडीओला 6.2 मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आलं आहे. सांगायचं झालं तर, अभिननेत्याचा हा फक्त व्हिडीओ नाही तर, विचार करायला लावणारा विषय आहे.