AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकरांच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन

Singer Passes Away : नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का बसला असून सुप्रसिद्ध गायकाचं निधन झालं आहे.

नाना पाटेकरांच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन
| Updated on: Oct 17, 2026 | 5:56 PM
Share

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. अशातच आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीवर पुन्हा शोककळा पसरली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार आणि गायक देवा यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘थेनिसाई थेंद्रल’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या देवा यांनी आपल्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अभिनेते विजय सेतुपती आणि खुशबू सुंदर, संगीतकार जी. व्ही. प्रकाश कुमार आणि गीतकार वैरामुथू यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

देवा यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील ४०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिलं. १९९० च्या दशकात त्यांची गाणी खूप लोकप्रिय झाली आणि तमिळ चित्रपट संगीतात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘अण्णामलाई’, ‘बाशा’, ‘आसाई’, ‘कादल कोट्टई’ आणि ‘खुशी’ यांसारख्या चित्रपटांतील गाण्यांमुळे ते घराघरात पोहोचले. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीने एक असा कलाकार गमावला आहे, ज्यांची गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.

विजय सेतुपतीने देवा यांना श्रद्धांजली वाहिली

अभिनेता विजय सेतुपतीनं सोशल मीडिया पोस्टद्वारे देवा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. त्यानं तमिळ चित्रपट संगीतातील देवा यांच्या योगदानाचं स्मरण केलं आणि म्हटलं की, त्यांची गाणी लोकांच्या स्मरणात कायम राहतील. विजय सेतुपतीनं लिहिलं, ‘तमिळ चित्रपट संगीत विश्वात आपली अमिट छाप सोडणाऱ्या संगीतकार देवा सरांच्या निधनानं खूप दुःख झालं आहे. त्यांचं संगीत आणि त्यांची गाणी नेहमीच स्मरणात राहतील.’

देवा यांची संगीत कारकीर्द तीन दशकांहून अधिक काळ चालली. त्यांच्या सर्वात गाजलेल्या संगीत रचनांमध्ये ‘अण्णामलाई’, ‘बाशा’, ‘आसाई’, ‘कादल कोट्टई’, ‘नेरुक्कू नेर’, ‘निनाइथेन वंधाई’, ‘प्रियमुदन’, ‘वाली’ आणि ‘खुशी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या अनेक चित्रपटांसाठी अविस्मरणीय संगीत दिलं. त्यांनी अभिनेता विजय यांच्या १५ हून अधिक चित्रपटांनाही संगीत दिलं. २० नोव्हेंबर १९५० रोजी जन्मलेल्या देवा यांनी आपल्या कठोर परिश्रमातून आणि संगीताच्या जाणकारीतून चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांची गाणी सर्व पिढ्यांतील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट