Mayank Pawar : 7 वेळा मिस्टर इंडिया… 37 व्या वर्षी जगाचा निरोप, मयंक पवारबद्दल घ्या जाणून

Mayank Pawar Death : स्प्लिट्सव्हिला 7 फेम अभिनेता मयंक पवारचे निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे टेलिव्हिजन आणि फिटनेस जगतात शोककळा पसरली आहे. त्याची कारकीर्द जाणून घेऊयात.

Mayank Pawar : 7 वेळा मिस्टर इंडिया... 37 व्या वर्षी जगाचा निरोप, मयंक पवारबद्दल घ्या जाणून
Mayank Pawar Journey
Image Credit source: Google
बापू गायकवाड | Updated on: Feb 24, 2026 | 7:05 PM

स्प्लिट्सव्हिला 7 फेम अभिनेता मयंक पवारचे निधन झाले आहे. त्याने वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या अचानक जाण्याचे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मयंक हा एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला सीझन 7 मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होता. त्याच्या निधनामुळे टेलिव्हिजन आणि फिटनेस जगतात शोककळा पसरली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याने 1 जानेवारी रोजी वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काही दिवसांनीच त्याचे निधन झाले आहे. मात्र त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत माहिती समजू शकलेली नाही.

मयंक पवारच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान असणारा मयंक पवार नेहमीच आपल्या हृदयात राहील. 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत राणा प्रताप बाग येथील संगम पार्क येथील वाल्मिकी मंदिरात शोकसभा आयोजित केली जाणार आहे.

Loading...

1 जानेवारीला साजरा केला वाढदिवस

मयंकचा जन्म 1 जानेवारी 1989 रोजी झाला, त्याने 1 जानेवारी 2026 रोजी 37 वा वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. एका चाहत्याने लिहिले की, “काही दिवसांपूर्वी मी त्यांचा स्प्लिट्सव्हिला प्रवास पाहत होतो. मला विश्वास बसत नाहीये. स्प्लिट्सव्हिलामध्ये मी इतका चांगला माणूस कधीच पाहिला नव्हता. सर्वजण रडले, अगदी सनी लिओनी देखील भावूक झाली होती. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “आम्ही एक खरा रत्न गमावला आहे… भाऊ, तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात राहाल.”

मयंक पवार कोण आहे?

मयंक पवार फिटनेसच्या जगात खूप लोकप्रिय होता.त्याने सात वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता. तसेच त्याने मिस्टर एशियाचाही किताब पटकावला होता. कठोर परिश्रम आणि बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस प्रशिक्षणासाठी दिलेल्या योगदानामुळे त्याला लाखो लोकांनी फॉलो केले होते. त्याला स्प्लिट्सव्हिला 7 द्वारे मोठी ओळख मिळाली होती. या शोमध्ये त्याच्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाने सर्वांची मने जिंकली होती. तो नेहमीच टास्क दरम्यान पूर्ण उत्साह दाखवत असे, ज्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते.

सनी लिओन झाली होती भावूक

मयंकचा एलिमिनेशन एपिसोड शोमधील सर्वात चर्चेत असलेल्या एपिसोडपैकी एक होता. मयंक व्हिला सोडत असताना, होस्ट सनी लिओन भावुक झाली होती, तिने त्याला मिठी मारली होती, तसेच को होस्ट निखिल चिनप्पानेही त्याला मिठी मारली होती. हा क्षण शोमधील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक होता. चाहते त्याच्या निधनावर हळहळ व्यक्त करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us