AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mayank Pawar Death : मयंक पवारचे निधन! कधीकाळी त्याच्यासाठी रडली होती सनी लिओनी

Mayank Pawar : मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. स्प्लिट्सव्हिला 7 फेम अभिनेता मयंक पवारचे निधन झाले आहे. त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे.

Mayank Pawar Death : मयंक पवारचे निधन! कधीकाळी त्याच्यासाठी रडली होती सनी लिओनी
Mayank Pawar DeathImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 24, 2026 | 6:29 PM
Share

स्प्लिट्सव्हिला 7 फेम अभिनेता मयंक पवारचे निधन झाले आहे. त्याच्या अचानक जाण्याचे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मयंक हा एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला सीझन ७ मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होता. त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे. मयंकच्या मृत्यूची बातमी कळताच, सोशल मीडियावर अनेकांना त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचे निधन नेमकं कशामुळे झाले याबाबत माहिती समजू शकलेले नाही.

‘स्प्लिट्सव्हिला 7’ मध्ये मिळाली खास ओखळ

मयंक पवार यांनी एमटीव्हीच्या लोकप्रिय शो ‘स्प्लिट्सव्हिला 7’ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या शोमध्ये तो वादग्रस्त ठरला होता, मात्र त्याने शोमध्ये स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले होते. मात्र आता त्याचे अवघ्या 37 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

इंस्टाग्राम पोस्ट काय आहे?

मयंक पवारच्या अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात लिहिले आहे की, एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणा देणारा मयंक नेमही अनेकांचा हृदयात राहील. 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत राणा प्रताप बाग येथील संगम पार्क येथील वाल्मिकी मंदिरात शोकसभा आयोजित केली जाणार आहे. या शोकसभेला अनेक चाहते हजर राहण्याची शक्यता आहे.

सनी लिओन मयंकसाठी भावुक झाली होती

‘स्प्लिट्सव्हिला 7’ मधील एक क्षण अजूनही चाहत्यांच्या डोळ्यासमोर आहे. या शोची होस्ट सनी लिओन मयंक पवारसाठी भावुक झाली होती. एका टास्क दरम्यान, सनी लिओनच्या डोळ्यात अश्रू आले. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मयंकच्या निधनानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

‘स्प्लिट्सव्हिला’च्या अनेक प्रेक्षकांनी मयंकला श्रद्धांजली वाहिली आहे. “गॉन टू सून” आणि “RIP मयंक” हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी लिहिले की, मयंकचे अचानक निधन झाले हे हृदयद्रावक आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक