Sridevi : शूटिंगदरम्यान श्रीदेवी पडलेल्या बेशुद्ध, डोक्यालाही लागलेलं; दिग्दर्शक म्हणाले, राम गोपाल वर्मामुळे…
Pankaj Parashar On Sridevi : शूटिंगदरम्यान श्रीदेवी बेशुद्ध पडलेल्या. त्यांना दुखापतही झालेली आणि त्यामुळे त्यांनी शूटिंगमधून ब्रेक घेतलेला. याबद्दल दिग्दर्शक पंकज पराशर यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं.

श्रीदेवी या बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण, त्यांना फिट राहण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागलेला. अशातच आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक पंकज पराशर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत श्री देवी यांच्यासोबत घडलेला एक प्रकार सांगितला आहे.
पंकज पराशर यांनी सांगितलेला प्रसंग
‘मेरी बीवी का जवाब नहीं‘ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडलेली. ‘फ्रायडे टॉकीज‘ला दिलेल्या मुलाखतीत पंकज पराशर यांनी याबद्दल सांगितलेलं. श्रीदेवी यांनी वजन कमी करण्यासाठी कडक डाएट केलेलं. पण, या डाएटचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. शूटिंगदरम्यान श्रीदेवी बेशुद्ध पडल्या आणि त्यांना दुखापतही झालेली.
पंकज पराशर यांनी सांगितलं की, राम गोपाल वर्मा यांनी श्रीदेवी यांच्यावर वजन कमी करण्यासाठी दबाव टाकलेला. श्रीदेवी यांनी राम गोपाल वर्मा यांच्या 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्षण क्षणम‘ या सिनेमात काम केलेलं. श्रीदेवी यांनी या सिनेमासाठी कडक डाएट सुरू केलं, त्यांनी मीठही खाणं बंद केलेलं. त्यांना बीपीचा त्रास झाला. पुढे ‘मेरी बीवी का जवाब नाही‘ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी अचानक बेशुद्ध पडल्या. त्यांचं डोकं टेबलला आपटलं आणि त्या 20 मिनिटं बेशुद्ध होत्या, असं पराशर यांनी सांगितलं. यादरम्यान, श्रीदेवी यांनी दुखापत झाली आणि त्यांचा एक दातही तुटला.
या घटनेनंतर श्रीदेवी यांनी शूटिंगमधून ब्रेक घेतला. त्यामुळे सिनेमाच्या शूटिंगच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. पंकज पराशर यांनी सांगितलं की, सिनेमांच्या फायनान्सरने प्रोजेक्टमधून माघार घेतली आणि नंतर निर्मात्यांचंही निधन झालं. एकामागून एक अडचणी येत असल्याने पराशर यांना या सिनेमा सोडावा लागला. पण, 2004 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला.
दरम्यान, ‘कॉफी विथ करण‘ मध्ये या सिनेमाबद्दक बोलताना अक्षय म्हणालेला की, या सिनेमाचा क्लायमॅक्स कधीच पूर्ण झाला नव्हता. सिनेमाच्या शेवटी एक लिखित संदेश देण्यात आलेला आणि त्यात सिनेमातील पात्रांनी शेवटी बदला घेतल्याचं सांगितलं.
