स्मशानभूमीत जखमी अवस्थेत बसलेली महिला, पाहताच प्रसिद्ध कॉमेडियमने मानलं आई, तिनेच अखेरच्या घटका मोजताना असा आशीर्वाद दिला, ज्यामुळे सर्वकाही…

प्रसिद्ध कॉमेडियनने स्मशानभूमीत जखमी अवस्थेत बसलेल्या एका महिलेला स्वतःच्या घरी आणलं, तिला आई मानलं... त्याच महिलेना अखेरच्या घटका मोजत असताना अशा आशिर्वाद दिला ज्यामुळे त्याचे दिवस पूर्णपणे बदलले....

स्मशानभूमीत जखमी अवस्थेत बसलेली महिला, पाहताच प्रसिद्ध कॉमेडियमने मानलं आई, तिनेच अखेरच्या घटका मोजताना असा आशीर्वाद दिला, ज्यामुळे सर्वकाही...
| Updated on: Oct 14, 2026 | 1:22 PM

ज्या कॉमेडियनने स्मशानभूमित बसलेल्या महिलेला घरी आणलं आणि तिची आई म्हणून सेवा केली… तो सेलिब्रिटी दुसरा तिसरा कोणी नाही तर, सुदेश लहरी आहे. आज सुदेश कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे, पण एक वेळ अशी आलेली जेव्हा सुदेश याच्याकडे दोन वेळचं पोट भरण्यासाठी देखील पैसे नव्हते… आज सुदेश याच्याकडे महागड्या गाड्या, आलिशान बंगला, सुखसोयी सर्वकाही आहे, पण एक काळ असा होता जेव्हा, त्याला कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी स्वतःची ट्रॉफी देखील विकावी लागलेली… आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल खुद्द सुदेश याने मोठा खुलासा केला.

एका मुलाखतीत सुदेश म्हणालेला, ‘त्यावेळी परिस्थिती प्रचंड बिकट होती. घरात गरिबीचं राज्य होतं आणि फार कमी वयात माझ्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. मी छोटे दुकान, फॅक्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. घरात परिस्थिती इतकी खराब होती की, कधी – कधी चहा बनवण्यासाठी देखील पैसे नसायचे… पण जेव्हा चहाच्या दुकानात कामाला लागलो तेव्हा, कंपन्या आणि फॅक्ट्रीमध्ये चहा पोहोचवायचो.. तेव्हा एका रिकाम्या कपात स्वतःसाठी थोडा चहा काढून घ्यायचो… मी फार लहान होतो, माझ्या पायात चप्पल देखील नव्हती…’

Loading...

सुदेश लहरींच्या आयुष्यातील एक कठीण काळ असाही होता, जेव्हा त्यांना एक अत्यंत कठीण निर्णय घ्यावा लागला होता. सुदेश याने सांगितलं की, एकदा कुटुंबाला जेवण खायला घालण्यासाठी त्याने स्वतःची ट्रॉफी अवघ्या 300 – 400 रुपयांना विकली होती. पण म्हणतात ना की प्रत्येकाची वेळ बदलत असते. सुदेश लहरींच्या आयुष्यातही तो क्षण आला, जेव्हा त्यांचं आयुष्य पुर्णपणे बदललं. ‘लाफ्टर शेफ्स’च्या सेटवर कृष्णा अभिषेकने सुदेश लहरीच्या आयुष्यात आलेल्या प्रसिद्धीचं आणि यशाचं रहस्य सांगितलं होतं.

कृष्णाने शोमध्ये सांगितलेलं, ‘सुदेश लहरी याने कधीच माध्यमांना सांगितलं नाही आणि कोणत्या मुलाखतीत देखील याचा उल्लेख केला नाही, ते नातेवईकाच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेलेले. तेव्हा स्मशानभूमीच्या एका कोपऱ्या बसलेल्या एका महिलेकडे त्यांची नजर गेली. ती महिला जखमी अवस्थेत बसलेली. सुदेशने त्या महिलेला घरी आणलं, तिला आई मानलं आणि त्या महिलेची सेवा केली…’

त्या महिलेने अखेरच्या घटका मोजत असताना सुदेश यांना एक आशिर्वाद दिला, ‘तुझं कधीच वाईट होणार नाही. ती यशाच्या उच्च शिखरावर पोहोचशील…’, त्यानंतर सुदेश यांना मुंबईतून कॉल आला आणि त्या एका कॉलने सुदेश लहरी यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. आज सुदेश लहरी काय आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही… असं कृष्णा अभिषेक याने सांगितलं होतं. पण सुदेश यांनी कधीच यावर वक्तव्य केलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us