Sunil Grover : ना स्टारडमचा रुबाब, ना सिक्युरिटीचा ताफा! सुनील ग्रोवर रस्त्याच्या कडेला बसून हे काय करु लागला, फोटो पाहून म्हणाल…
दिवाळीच्या दिवशी अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोवरने पुन्हा एकदा आपल्या साध्या अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुनीलने यावेळी असं काही केलंय की त्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. त्याला अनेक आर्शिवादही दिले आहेत .

दिवाळी म्हटलं की बाजारात फुलांची, तोरणांची आणि सजावटीच्या सामानाची गर्दी पाहायला मिळते. अशाच दिवाळीच्या वातावरणात अभिनेता सुनील ग्रोवरचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत सुनील रस्त्याच्या कडेला फुलं विकणाऱ्या काही लहान मुलींसोबत जमिनीवर बसलेला दिसत असून तो त्या मुलींसोबत हार विकत आहे. साधा टी – शर्ट आणि शॉर्टस घातलेला सुनील हातात फुलं आणि कंदील घेऊन बसला आहे. त्याच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.
सुनील ग्रोवरचा साधेपणा त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. इतका मोठा हिरो सहज माणसात मिसळतो,कसलीही सिक्युरीटी नाही. त्याचा हाच अंदाज त्याच्या चाहत्यांना आवडतो. सुनील ग्रोवरने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यासोबतच कॅप्शनही दिलं आहे. ‘सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा’, तुमच्या आयुष्यात प्रेम आणि प्रकाश येवो. असे कॅप्शन त्याने फोटोला दिले आहे. फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रचंड कौतुक केले आहे. एका चाहत्याने लिहिलंय की एकच तर दिल आहे कितीवेळा जिंकणार, तर दुसरा चाहता म्हणतोय की इतका डाऊन टू अर्थ असणारा अभिनेता मी याआधी पाहिलेला नाही. तुमचा मुकाबला कोणीही करणं अशक्य आहे.
विशेष म्हणजे, सुनील यांच्यासाठी अशा प्रकारे सामान्य लोकांमध्ये मिसळणे नवीन नाही, त्याने यापूर्वीही सोशल मीडियावर असे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. कधी तो घाटावर चादर टाकून सामान्य माणसांसोबत झोपताना दिसतो, तर कधी प्रेमाने म्हशींना अंघोळ घालत असतोय. एवढंच नाही तर रस्त्याच्या कडेला बसून पँटला इस्त्री करून घेतानाचा त्याचा व्हिडिओही चर्चेत आला होता.
दुसरीकडे सुनील ग्रोवर सध्या द ग्रेट इंडियन कपिल शो मधील विविध व्यक्तिरेखांमुळही चर्चेत असतो. अलीकडेच त्याने या कार्यक्रमात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा लूक साकारला होता. त्याच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
एकीकडे मोठ्या पडद्यावर आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसवणारा सुनील, तर दुसरीकडे सामान्य लोकांसोबत सहजपणे वेळ घालवणारा त्याचा हा अंदाज चाहत्यांचा भावला आहे. त्यामुळे त्याचा हा दिवाळीतील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सगळीकडे त्याचे कौतुक होत आहे.