AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput Ashes immersion | नावेतून गंगा नदी पार, सुशांतसिंह राजपूतच्या अस्थीचं कुटुंबियांकडून विसर्जन

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. (Sushant Singh Rajput Ashes immersion Submerging after funeral)

Sushant Singh Rajput Ashes immersion | नावेतून गंगा नदी पार, सुशांतसिंह राजपूतच्या अस्थीचं कुटुंबियांकडून विसर्जन
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 18, 2020 | 3:34 PM
Share

पाटणा : गंगा नदीत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे अस्थीविसर्जन करुन अखेरचा निरोप देण्यात आला. पाटण्यात सुशांतचे वडील, बहीण, भावोजीसह काही नातेवाईकांनी नदी पार करुन अस्थीकलश विसर्जित केला. (Sushant Singh Rajput Ashes immersion Submerging after funeral)

सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील बिहारहून मुंबईत आले होते. सुशांतच्या पार्थिवावर 15 जूनला मुंबईतील विले पार्लेत पवन हंस स्मशानभूमीत संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात वडिलांकडून त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी त्याची बहीण, तिचा पती, मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि काही जवळचे नातेवाईक, मित्र उपस्थित होते.

कूपर रुग्णालयापासून सुरु झालेल्या त्याच्या अखेरच्या प्रवासात वरुणराजानेही हजेरी लावली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, अभिनेते विवेक ओबेरॉय, रणवीर शौरी यासारखे मोजके कलाकार वगळता मोठ्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली नाही.

हेही वाचा : सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार

सुशांतने रविवार 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.

सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. (Sushant Singh Rajput Ashes immersion Submerging after funeral)

मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. वांद्रे पोलीस आज सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवत आहेत. रिया चक्रवर्ती आज सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झाली.

रिया ही सुशांतची मैत्रीण आहे. सुशांत तिच्या संपर्कात होता. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं कारण काय असू शकतं, याबाबत पोलीस तिच्याकडे विचारणा करु शकतात.

त्याआधी पोलिसांनी काल कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा.

सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली.

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput suicide investigation | रिया चक्रवर्ती वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये

Sushant Singh Rajput Suicide | सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा चार यंत्रणांकडून तपास, गूढ शोधण्याचं आव्हान 

(Sushant Singh Rajput Ashes immersion Submerging after funeral)

Follow Us
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला;
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला होता; व्हिडीओ व्हायरल, हल्लेखोर त्याच परिसरात होते?
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर...
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!