AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Suicide Case | पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप

विनय तिवारी यांच्या हातावर मुंबई महापालिकेने मारलेल्या होम क्वारंटाईनच्या शिक्क्यात 15 ऑगस्ट ही तारीख दिसत आहे.

Sushant Suicide Case | पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप
| Updated on: Aug 03, 2020 | 8:46 AM
Share

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप होत आहे. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी बीएमसीने जाणूनबुजून क्वारंटाईन केल्याचा आरोप आहे. (Sushant Singh Rajput death investigation Bihar Police Patna SP Vinay Tiwari allegedly forcibly Home Quarantine)

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिडीओ ट्वीट करत आरोप केला आहे. “सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाचे नेतृत्व करणारे विनय तिवारी. ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत (काल) रात्री 11 वाजता त्यांना बळजबरीने क्वारंटाईन करण्यात आले. आता ते कुठेच निघू शकत नाहीत” असा दावा पांडे यांनी ट्विटरवर केला आहे.

“विनय तिवारी यांनी विनंती करुनही त्यांची आयपीएस मेसमध्ये व्यवस्था करण्यात आली नाही. ते गोरेगावच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत” असेही पांडे यांनी फेसबुकवर सांगितले. विनय तिवारी यांच्या हातावर मुंबई महापालिकेने मारलेल्या होम क्वारंटाईनच्या शिक्क्यात 15 ऑगस्ट ही तारीख दिसत आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांनी पाटणा शहर एसपी विनय तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची टीम मुंबईला पाठवली आहे. सुशांतच्या बॅंक खात्यातून 15 कोटी रुपयांची रक्कम परस्पर वळती केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने रियावर केला आहे.

दुसरीकडे, रिया चक्रवर्ती हिचा पत्ता पोलिसांना लागत नाहीये. रियाच्या घरी चौकशीसाठी गेलेल्या टीमला ती सापडली नाही. एका बड्या बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी ती लपून बसल्याचा दावा केला जात आहे. मात्र रिया पाताळात गेली, तरी आम्ही तिला शोधून काढू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, विनय तिवारी यांनी सुशांतचा स्टाफ मेम्बर सिद्धार्थ पिठाणी आणि दीपेश सावंत यांना नोटीस पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कलम 160 अन्वये पाठवलेल्या नोटीस अंतर्गत पोलिसांना कोणत्याही साक्षीदाराला बोलवण्याचा अधिकार आहे.

सिद्धार्थ पिठाणी आणि दीपेश सावंत यांची समोरासमोर चौकशी होणार आहे. बिहार पोलिसांना या दोघांनी दिलेले स्टेटमेंट वेगवेगळे असल्याचा संशय आहे. सिद्धार्थ पिठानी जबाब बदलत असून रियाची बाजू घेत असल्याने बिहार पोलीस चौकशी करणार आहेत.

सिद्धार्थ पिठाणी बिहार पोलिसांचा फोन कॉल घेत नसल्याचीही माहिती आहे. बिहार पोलिसांनी त्याला आधीच हैदराबादहून मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या :

बिहार पोलीस सुशांतच्या मॅनेजरच्या आत्महत्येचीही चौकशी करणार, 48 तासात मोठ्या कारवाईची शक्यता

रियाने सुशांतच्या बँक खात्यातील 3 कोटी रुपये खर्च केल्याचं उघड

(Sushant Singh Rajput death investigation Bihar Police Patna SP Vinay Tiwari allegedly forcibly Home Quarantine)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.