AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतच्या जवळच्या मित्रांचा NCB कडून शोध, तर नोकर केशव-नीरज साक्षीदार होणार

सिद्धार्थ पिठाणी याच्या चौकशीत नीरज आणि केशव यांचं नाव आलं होतं. नीरज सिंग आणि केशव बचनेर हे दोघे सुशांतकडे घरकाम करत होते. (Sushant Singh Rajput Neeraj Keshav )

सुशांतच्या जवळच्या मित्रांचा NCB कडून शोध, तर नोकर केशव-नीरज साक्षीदार होणार
सुशांत सिंह राजपूत
| Updated on: Jun 01, 2021 | 12:46 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajput Suicide related Drugs Nexus) सुशांतच्या जवळच्या मित्रांचा शोध सुरु करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरु केला आहे. सुशांतसोबत गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी याशिवाय सुशांतचे नोकर केशव बचनेर, नीरज सिंग असे अनेक जण राहत होते. (Sushant Singh Rajput Suicide related Drugs Nexus Neeraj Keshav to become witness)

केशव आणि नीरज होणार साक्षीदार

मुंबईत उपलब्ध असलेल्या व्यक्तींची अनेक यंत्रणांनी चौकशी केली होती. मात्र सिद्धार्थ पिठाणी, केशव, नीरज हे तेव्हा मुंबईच्या बाहेर पळून गेले होते. एनसीबी अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ पिठाणी याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे, तर केशव आणि नीरज यांना साक्षीदार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज रॅकेटचा तपास एनसीबीही करत असून दाखल गुन्ह्यात आतापर्यंत 35 जणांना अटक करण्यात आली आहे.

सुशांतच्या ड्रग्जविषयी दोघांना माहिती?

सिद्धार्थ पिठाणी याच्या चौकशीत नीरज आणि केशव यांचं नाव आलं होतं. नीरज सिंग आणि केशव बचनेर हे दोघे सुशांतकडे घरकाम करत होते. सुशांतला कोण कोण ड्रग्ज देत होतं, कोण ड्रग्ज मागवत होतं, याची सर्व माहिती पिठाणीप्रमाणेच केशव आणि नीरज यांना होती. एनसीबी अधिकाऱ्यांनी पिठाणीला अटक केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या नीरज आणि केशव यांच्याही अटकेची शक्यता व्यक्त केली जात होती. या दोघांना काल एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

साक्षीदार होण्याची तयारी

अभिनेत्री सारा अली खान हिच्या घरी कुक म्हणून काम करणाऱ्या केशवला एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. तर अभिनेता फरहान अख्तरच्या घरी काम करत असलेल्या नीरजलाही ताब्यात घेतलं. त्याच्याकडे सतत चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी या प्रकरणात साक्षीदार होण्याची तयारी दाखवली. या चौकशीनंतर दोघांनी या प्रकरणात साक्षीदार होण्याचं कबूल केलं. त्यानंतर त्यांची महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर साक्ष नोंवण्याची प्रक्रिया सुरू झाली.

सुशांतसोबत राहणाऱ्या अनेक जणांपैकी काही जण परदेशात, तर काही जण भारताच्या वेगवेगळ्या भागात निघून गेले आहेत. त्यांना सुशांतसोबत नक्की काय झालं याची संपूर्ण माहिती आहे. त्यापैकी काही जणांची नावं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. त्यांच्या मागावर एनसीबीचे अधिकारी आहेत.

संबंधित बातम्या :

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई, रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव

(Sushant Singh Rajput Suicide related Drugs Nexus Neeraj Keshav to become witness)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.