AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulshan Kumar : निर्माता मंदिरात दर्शनाला गेले अन्…एका मृत्यूने बॉलिवूड हादरलेलं, टायगर प्रकरणानंतर त्या घटनेची पुन्हा चर्चा

Gulshan Kumar : २०२६ मध्ये चित्रपटसृष्टी गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या दहशतीखाली आहे. टायगर श्रॉफवरील हल्ला हा अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या गुलशन कुमार हत्याकांडाची आठवण करून देतो. १९९७ मध्ये गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

Gulshan Kumar : निर्माता मंदिरात दर्शनाला गेले अन्...एका मृत्यूने बॉलिवूड हादरलेलं, टायगर प्रकरणानंतर त्या घटनेची पुन्हा चर्चा
| Updated on: Oct 22, 2026 | 8:16 PM
Share

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं एके काळी चित्रपटसृष्टीवर आपली सावली टाकली होती. २०२६ मध्ये, दाऊदचा प्रभाव कमी झालेला असताना, एक नवीन धोका निर्माण झाला आहे. आता बॉलिवूडचे कलाकार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या दहशतीला सामोरे जात आहेत. १८ ऑक्टोबर रोजी, लॉरेन्सच्या गुंडांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर पाच गोळ्या झाडून त्याच्यावर हल्ला केला. टायगरवरील या गोळीबारामुळे अनेक वर्षांपूर्वीच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत. टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांच्यावर १६ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्या गोळीबारातून टायगर बचावला, पण गुलशन कुमार यांना आपला जीव गमवावा लागलेला.

गुलशन कुमार यांचं हत्या प्रकरण, अनेक वर्षांनंतरही, सर्वात भीषण गुन्हेगारी कथांपैकी एक मानलं जातं. १२ ऑगस्ट १९९७ रोजी त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्या दिवशी, गुलशन कुमार सकाळी मुंबईतील अंधेरी भागातील एका मंदिरात गेले होते, जिथे ते रोज प्रार्थना करत असत. पण कोणाला माहित होतं की, मंदिराबाहेर मृत्यू त्यांची वाट पाहत होता? मंदिरातून बाहेर येताच तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर १६ गोळ्या झाडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा कट कोणी रचला?

दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येनं संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली. लोक हादरले होते. गुलशन कुमार यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित होता. तपासात असं उघड झालं की, हल्लेखोर जवळपास दोन महिन्यांपासून गुलशन कुमार यांच्या हालचालींवर पाळत ठेवत होते. त्यांनी पाहणी करून हत्येचा कट रचला. गुलशनच्या हत्येमागे दाऊद इब्राहिमची टोळी असल्याचा पोलिसांचा विश्वास होता. हत्येनंतर अनेक लोकांवर संशय आला. ३० ऑगस्ट १९९७ रोजी संगीतकार नदीम अख्तर सैफीचं नाव समोर आलं. गुलशन कुमार यांच्या हत्येच्या कटात त्याचा सहभाग असल्याचं म्हटलं जात होतं.

नदीमच्या अल्बमवरून दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. पण, नंतर नदीम या प्रकरणात निर्दोष आढळला. ऑक्टोबर १९९७ मध्ये, टिप्स म्युझिकचे मालक रमेश तौरानी यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दावा केला की, रमेशने गुलशन कुमारच्या मारेकऱ्यांना अडीच लाख रुपये दिले होते. पण, हा आरोप न्यायालयात सिद्ध झाला नाही आणि तौरानी यांची निर्दोष मुक्तता झाली.

नोव्हेंबर १९९७ मध्ये, मुंबई पोलिसांनी या खून प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं. पोलिसांनी सांगितलं की, गुलशन कुमार यांना मारण्याचा कट दुबईमध्ये रचण्यात आला होता. एप्रिल २००२ मध्ये, न्यायालयानं अब्दुल रौफ उर्फ ​​दाऊद मर्चंट याला खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गुलशन कुमार यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांपैकी अब्दुल एक होता.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ