AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निक्की तांबोळी अन् वाद…; दोन दिवसात तिघांशी भांडण, बिग बॉसच्या घरात टीम A मध्ये फूट

Nikki Tamboli and Arbaz Patel Conflict : बिग बॉसच्या घरातील हा आठवडा वादाचा आठवडा असल्याचं दिसतंय. निक्की तांबोळी आणि घन: श्याम यांच्यात वाद झाल्यानंतर आता अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालंय. निक्की आणि वैभवमध्येही वादाची ठिणगी पडलीय. वाचा सविस्तर...

निक्की तांबोळी अन् वाद...; दोन दिवसात तिघांशी भांडण, बिग बॉसच्या घरात टीम A मध्ये फूट
बिग बॉसच्या घरात वादImage Credit source: Instagram
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 20, 2024 | 12:40 PM
Share

‘बिग बॉस मराठी’ च्या या सिझनची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात काय घडतं, काय बिघडतं हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. ‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील हा चौथा आठवडा वादाचा ठरत आहे. कारण टीम एमध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की तांबोळी आणि तिच्या टीम एमधील सदस्यांची जोरदार भांडणं झाली आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की आणि घन:श्याममध्ये कल्ला झालेला पाहायला मिळाला. आता आजच्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली दिसून येत आहे.

निक्की- अरबाजचं भांडण

‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील नवा प्रोमोसमोर आला आहे. यात निक्की आणि अरबाजमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं दिसत आहे. निक्की अभिजीतला म्हणत आहे,”तुला वाटतं का की मी मनापासून माफी मागत नाही”. त्यावर अभिजीत म्हणतो,”हा तू मनापासून माफी मागते”. निक्की अभिजीतसोबत बोलल्याने अरबाजचा राग अनावर झाला आहे. आता अभिजीतमुळे निक्की-अभिजीत एकमेकांपासून दूरावणार का? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

वैभवसोबत निक्कीचा वाद

निक्की तांबोळी आणि वैभव चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात सध्या ‘सत्याचा पंचनामा’ हे कार्य पार पडत आहे. यासंदर्भातला आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये वर्षा ताईंचा सत्याचा पंचनामा होताना दिसत आहे. निक्कीसाठी मी कोणतंही फेव्हर घेणार नाही, असं वैभव म्हणतो. यावर निक्की म्हणते, मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यावर वैभवही निक्कीला उत्तर देतो. तू थेट तुझं मत मांडू शकत नाही, असं तो म्हणतो. घन:श्यामने निक्कीच्या वागण्यावर भाष्य केलं आहे. निक्कीच्या अशा वागणुकीमुळे टीमचा घात होऊ शकतो, असं तो म्हणतो.

बहिण- भावाच्या नात्यात फूट

छोटा पुढारी आणि निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. निक्की आणि छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला आहे. निक्की घन:श्यामला तू फेक आहेस, असं म्हणते. त्यावर घन:श्याम तिला विचारतो की, काय फेक वागलोय ते तर सांग.. तू किती आपली आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय… तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता मी.. निक्कू ताई बोलल्यामुळेच घात झालाय ना, असं घन: श्याम म्हणाला. त्या निक्की म्हणते की मग नको म्हणूनस बहिण… ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोणामध्ये वाद होईल हे सांगू शकत नाही. दोन सख्खे मित्र कधी वैरी होतील हे सांगता येत नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागातही प्रेक्षकांना हेच चित्र पाहायला मिळणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...