Shilpa Shettyची सर्वांसमोर केली थट्टा; मग शिल्पानंही दिलं जशास तसं उत्तर, पाहा VIDEO

Shilpa Shettyची सर्वांसमोर केली थट्टा; मग शिल्पानंही दिलं जशास तसं उत्तर, पाहा VIDEO
Shilpa Shetty

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडिया(Social Media)वर खूप सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीचा असाच एक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir)सोबतचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 30, 2021 | 6:41 PM

नवी दिल्ली : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडिया(Social Media)वर खूप सक्रिय असते. ती रोज तिचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना दाखवत असते. पण सध्या अभिनेत्रीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. जे पाहिल्यानंतर लोक तिची खिल्ली उडवत आहेत. मात्र, हा व्हिडिओ चेष्टेनं शूट करण्यात आला आहे. पण या व्हिडिओमध्ये मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) आणि शिल्पाची जोडी चांगलीच पसंत केली जातेय.

को-जज मारतो टोमणे
‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा 9वा सीझन पुढच्या वर्षी 15 जानेवारीपासून ऑन एअर होणार आहे. या शोच्या शूटिंगदरम्यान शिल्पा आणि मनोज खूप मस्ती करताना दिसताहेत. यावेळी सेटवरून दोघांचा एक व्हिडिओ समोर आलाय, तो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओवर लोक कमेंट्सही करत आहेत. या व्हिडिओमध्ये मनोज मुंतशीर त्याची को-जज शिल्पा शेट्टीला टोमणे मारताना दिसतोय.

शिल्पा खातेय बदाम
सोनी टीव्हीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी बदाम खाताना दिसतेय. यावर मनोज तिची थट्टा करतो आणि म्हणतो, ‘शिल्पा जी, ही बुद्धी आहे ना… बदाम खाऊन येत नाही… धुवून खाल्ल्यावर येते’. यावर विचार करून शिल्पा म्हणते, ‘अच्छा, तर तू बदाम धुवून खात नाहीस. म्हणून…’ शिल्पाचं हे उत्तर ऐकून मनोजचा चेहरा पडतो.

चाहते करतायल लाइक आणि शेअर
शिल्पा शेट्टी आणि मनोज मुंतशीरचा हा मजेदार व्हिडिओ लोकांना खूप आवडला. दोघांचेही चाहते हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्यावर कमेंट करत आहेत. शिल्पानं यापूर्वीही तिच्या इन्स्टाग्रामवर असाच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. अर्जुन बिजलानी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या 9व्या सीझनचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. या आगामी हंगामात जजच्या पॅनेलमध्येही बदल करण्यात आलेत. यावेळी रॅपर बादशाहही जजच्या भूमिकेत दिसणार आहे.

Sushmita Senनं सांगितलं रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपचं कारण; म्हणाली, अशा गोष्टींचा विचार करायला लागले तर…

Salman Khan Birthday Gifts : सलमान खानला त्याच्या वाढदिवशी मिळाल्या करोडोंच्या भेटवस्तू, सर्वात महागडं गिफ्ट कोणी दिलं?

Irrfan Khan यांच्या मृत्यूनंतर रिलीज होणार त्यांचा अखेरचा चित्रपट, पुन्हा अनुभवायला मिळणार अभिनय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें