AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सोनाली कुलकर्णीनं सांगितला ‘त्या’ इंटिमेट सीनचा किस्सा अन् रवीनं लपवला चेहरा

रवी किशन (Ravi Kishan) आणि सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) लवकरच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार आहेत. 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show)मध्ये अभिनेता सचिन खेडकर(Sachin Khedekar)ही या दोघांसोबत येणार आहे.

Video : सोनाली कुलकर्णीनं सांगितला 'त्या' इंटिमेट सीनचा किस्सा अन् रवीनं लपवला चेहरा
सोनाली कुलकर्णी
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 8:33 PM
Share

मुंबई : रवी किशन (Ravi Kishan) आणि सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) लवकरच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार आहेत. ‘द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show)मध्ये अभिनेता सचिन खेडकर(Sachin Khedekar)ही या दोघांसोबत येणार आहे. शोचा एक प्रोमो आलाय, यात सोनालीच्या बोलण्यामुळे रवी लाजल्यासारखा दिसतोय. प्रोमो व्हिडिओमध्ये, सोनाली आधीच्या दिवसांबद्दल बोलतेय, तिने रवी किशनच्या पत्नीचा रोल केला होता.

वेल डन अब्बाचा होता सीन सोनाली कुलकर्णी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या वेल डन अब्बा या चित्रपटात रवी किशनसोबत दिसली होती. या चित्रपटात भूमिका कशी मिळाली, याविषयी सोनाली सांगते, की तिला इंटिमेट सीन करण्यास सांगितलं होतं. सोनाली म्हणाली, की मला रवीसोबत काम करण्याची संधी मिळत होती. श्याम बाबू म्हणाले होते, तू भूमिका करणार का? मी हो म्हटलं. मग ते म्हणाले, तू त्याची बायको असशील. त्यावर मी होकार दिला.

…अन् रवी लाजला सोनाली म्हणाले, त्यांनी सांगितलं की आता तुला रवीवर उडी मारायचीय. पलंग तोड. यावर रवी म्हणाल, अरे बापरे… आणि लाजून त्यानं मान खाली घातली. पुढे सोनाली म्हणाली, की मी लाजेनं पाणी पाणी झाले होते. पण रवी आमच्यासोबत होता, त्यामुळे मजाही खूप आली. हा किस्सा ऐकून रवीचं लाजणं आश्चर्यात बदललं.

व्हिसलब्लोअरचं करतायत प्रमोशन रवी किशन, सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडकर त्यांच्या नवीन मालिका व्हिसलब्लोअरच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आलेत. या वेब सिरीजचे इतर स्टार्सही या शोमध्ये सहभागी होताना दिसणार आहेत. याशिवाय अक्षय कुमार आणि सारा अली खानदेखील त्यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या वीकेंडला कपिलच्या शोमध्ये येत आहेत.

VIDEO : ‘जर्सी’साठी शाहिद कपूरनं गाळलं रक्त आणि घाम! टाके पडल्यानंतरही जोरदार फटकेबाजी!!

Budget Mobile Phones : बजेट नाही? नो टेन्शन; ट्राय करा 20,000च्या आतले ‘हे’ मोबाइल फोन…

Entertainment : ‘हे’ चित्रपट आणि वेब सिरीज या आठवड्यात मोठा पडदा आणि OTTवर होणार प्रदर्शित

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.