AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘The Kapil Sharma Show’ टीव्हीवर नाही, तर ‘इथे’ पाहता येणार! पाहा कीकू शारदा काय म्हणाला…

कपिल शर्मा शोमध्ये बच्चू यादवची भूमिका साकारणार्‍या किकू शारदाने, हा कार्यक्रम टीव्ही किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर परत येण्याविषयी भाष्य केले आहे.

‘The Kapil Sharma Show’ टीव्हीवर नाही, तर ‘इथे’ पाहता येणार! पाहा कीकू शारदा काय म्हणाला...
कपिल शर्मा आणि कीकू शारदा
| Updated on: Mar 04, 2021 | 3:45 PM
Share

मुंबई : काही दिवसांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’ हा कॉमेडी शो तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला होता. शो ऑफ एअर जाण्याचे कारण, कोणतेही थेट प्रेक्षक नसल्याचे सांगितले गेले आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या या शोची प्रेक्षकांना आतुरतेने प्रतिक्षा आहे. कपिल शर्मा (Kapil Sharma) शोची संपूर्ण कलाकार टीम कीकू शारदा, कृष्णा अभिषेक, भारती सिंह, चंदन प्रभाकर हे सगळेच जण प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतात. मात्र, शो ऑफ एअर गेल्यापासून चाहते देखील नाराज झाले आहेत. मात्र, आता या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कपिल शर्माच्या या शोला नेटफ्लिक्सवर एक स्लॉट मिळाला असून, लवकरच हा कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (The Kapil sharma Show shifting on OTT Platform Netflix Actor Kiku Sharda reacts on this news).

कपिल शर्मा शोमध्ये बच्चू यादवची भूमिका साकारणार्‍या किकू शारदाने, हा कार्यक्रम टीव्ही किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर परत येण्याविषयी भाष्य केले आहे. बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत किकू शारदा म्हणाला की, ही माझ्यासाठी मोठी बातमी आहे. मी ही गोष्ट ऐकली नव्हती आणि हा कार्यक्रम बंद झाल्यापासून मी चॅनेलच्या लोकांशी अजिबात संपर्कात नाही.’

नेटफ्लिक्सवर कपिलला मिळाला स्लॉट!

अभिनेता कपिल शर्मा याने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, तो नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. आता नेटफ्लिक्सने जाहीर केले आहे की, कपिलचा शो ‘कपिल शर्मा कॉमेडी स्पेशल’ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, दुसरीकडे नेटफ्लिक्सच्या या घोषणेनंतर कपिल ‘सोनी टीव्ही’वर परतणार नाही का? कपिलचा कॉमेडी आता टीव्हीऐवजी नेटफ्लिक्सवरच पाहावा लागेल का?, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

नेटफ्लिक्स व्यतिरिक्त कपिल टीव्हीवरही कमबॅक करेल, अशी प्रेक्षक आणि त्याच्या चाहत्यांना आशा आहे. कपिल शर्माने अलीकडेच नेटफ्लिक्सचा एक प्रोमोही शेअर केला होता. हा प्रोमो शेअर करताना कपिलने लिहिले होते की, ‘चलो भाई नेटफ्लिक्स, बराच वेळ झाला आहे, आता तरी सांगा की माझी कॉमेडी स्पेशल ऑर्डर कधी येईल?(The Kapil sharma Show shifting on OTT Platform Netflix Actor Kiku Sharda reacts on this news)

नव्या दमाने परत येऊ!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भारती सिंहने एका मुलाखतीत या शोबद्दल सांगितले होते की, ‘हो, आम्ही ब्रेकवर आहोत पण काहीतरी नवीन करण्यासाठी! आम्ही ब्रेक घेत आहोत जेणेकरून आम्ही स्वतःस अपग्रेड करू शकू. नवीन पात्रांवर काम करण्यासाठी आमची टीम उत्साहित आहे. येत्या दोन महिन्यांत केवळ एखादाच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चॅनेलने शोला पुन्हा ब्रेक देण्याचे ठरवले आहे. मात्र, असे नाही की या दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीच्या वेळी आम्ही पूर्णपणे सुट्टीवर जाऊ. या काळात आम्ही एक टीम म्हणून नवीन पात्रांवर काम करू आणि अधिक जोमाने परत येऊ. प्रामाणिकपणे, आम्ही सर्व यासाठी उत्साही आहोत.’

(The Kapil sharma Show shifting on OTT Platform Netflix Actor Kiku Sharda reacts on this news)

हेही वाचा :

Sara Ali Khan | ‘व्हिटामिन सीचा डेली डोस’, मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर बिकिनीत सारा अली खानचा जलवा!

Shraddha Kapoor | चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘कपूर’ घराण्यात लवकरच ऐकू येणार सनईचे सूर!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.