The Kerala Story फेम अदा शर्मा १० वी पास; सिनेमातील अन्य कलाकारांचं शिक्षण जाणून व्हाल थक्क

फक्त १० वी पास असलेली अदा शर्मा आज कमावतेय कोट्यवधींची माया; 'द केरळ स्टोरी' सिनेमातील कलाकारांचं शिक्षण जाणून व्हाल थक्क... सर्वत्र सिनेमातील कलाकारांची चर्चा

The Kerala Story फेम अदा शर्मा १० वी पास; सिनेमातील अन्य कलाकारांचं शिक्षण जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 12:23 PM

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने देशात अनेक विक्रम मोडले आहेत. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने आतापर्यंत १९८.४७ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा लवकरच २०० कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्य घटनेवर आधारित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमातील कलाकारांची सध्या तुफान चर्चा रंगत आहे. चाहते देखील कलाकारांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. सध्या सिनेमातील कलाकारांच्या शिक्षणाबद्दल तुफान चर्चा रंगत आहे… झगमगत्या विश्वात सक्रिय राहून कोट्यवधी रुपयांची माया कमावणाऱ्या सेलिब्रिटींच्या शिक्षणाबद्दल आज जाणून घेवू…

अभिनेत्री अदा शर्मा – ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा हिचं १० वी पर्यंत शिक्षण झालं आहे… शिवाय अदा हिने कथक या शास्त्रीय नृत्य प्रकारात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. आता अदा तिच्या आवडत्या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची कमाई करते…

अदा हिने तलुगू, कन्नड आणि तामिळ सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. सध्या अदा ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमासाठी अभिनेत्री तब्बल १ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री भावना मखीजा – ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात भाग्यलक्ष्मी या भूमिकेला न्याय देणारी भावना हिने दिल्ली पब्लीक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं आहे…

अभिनेत्री देवदर्शनी चेतन – ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात शालिनी (अदा शर्माची आई) भूमिकेला न्याय देणाऱ्या देवदर्शनी हिचं एथिराज कॉलेजमधून सायकोलॉजीचं शिक्षण पूर्ण झालं आहे.

अभिनेत्री हुस्ना – ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात एलीना कौल या भूमिकेत दिसणाऱ्या हुस्ना हिने जम्मूच्या इंटरनॅशनल पब्लीक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं आहे…

अभिनेता पवण मिश्रा – ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात पवण मिश्रा एका दहशदवाद्याच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आला. अभिनेत्याने मास्टर इन फाईनांन्समध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या सर्वत्र पवण मिश्रा याच्या शिक्षणाची चर्चा रंगत आहे..

अभिनेत्री सोनिया बालानी – ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात खलनायकाच्या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री सोनिया बालानी हिने आसिफा नावाच्या भूमिकेत दिसली.. सोनिया हिने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध करण्यात आला. तर अनेक राज्यांमध्ये सिनेमाला बॅन देखील करण्यात आलं. पण कोणत्याही गोष्टीचा परिणाम सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर झालेला नाही. आता येत्या दिवसांत सिनेमात किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.