गुपचूप भेटणाऱ्या तरुण-तरुणींचं सर्वात आवडतं गाणं, 34 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही अनेकजण…

34 वर्षांपूर्वींचं गाणं, ज्याला आशा भोसले आणि कुमार सानू यांनी बनवलं सुपरहिट, आजही प्रेमात पडलेले तरुण-तरुणी यांचं सर्वात आवडतं गाणं. कानावर ऐकू येताच प्रत्येकजण गुणगुणतो.

गुपचूप भेटणाऱ्या तरुण-तरुणींचं सर्वात आवडतं गाणं, 34 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही अनेकजण...
| Updated on: Sep 10, 2026 | 2:47 PM

90 च्या दशकातील रोमँटिक गाण्यांची आठवण काढली की आजही अनेक लोकप्रिय गाणी चाहत्यांच्या ओठांवर येतात. यामध्ये 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जान तेरे नाम’ चित्रपटातील ‘हम लाख छुपाएं प्यार मगर’ या गाण्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. कुमार सानू आणि आशा भोसले यांच्या सुरेल आवाजात सजलेलं हे गाणं आजही जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.

या गाण्यात रोनित रॉय आणि फरहीन यांची जोडी पाहायला मिळाली होती. प्रेम लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रेमी-प्रेमिकांची हळवी आणि रोमँटिक कहाणी गाण्यातून सुंदरपणे मांडण्यात आली आहे. ‘लेकिन छुप छुप के मिलने से, मिलने का मजा तो आएगा’ यांसारख्या ओळी त्या काळातील तरुणाईच्या मनाला चांगल्याच भावल्या होत्या. त्यामुळे हे गाणं 90 च्या दशकातील प्रेमगीतांमध्ये विशेष ठरलं.

गुपचूप भेटणाऱ्या प्रेमाची गोष्ट

‘हम लाख छुपाएं प्यार मगर’ या गाण्याची खासियत म्हणजे त्यातील प्रेमाचा निरागस अंदाज. जगापासून आपलं प्रेम लपवण्याचा प्रयत्न करणारे प्रेमी, एकमेकांना भेटण्याची उत्सुकता आणि गुपचूप भेटण्याचा रोमांच या गाण्यातून पाहायला मिळतो. त्यामुळे त्या काळातील तरुणांना या गाण्याशी सहज नातं जोडता आलं.

‘जान तेरे नाम’ची कथा देखील कॉलेज, मैत्री आणि प्रेमाभोवती फिरणारी होती. चित्रपटात रोनित रॉय यांनी सुनील, तर फरहीन यांनी पिंकी मल्होत्रा ही भूमिका साकारली होती. या दोघांच्या प्रेमकहाणीला चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाचं स्थान होतं.

कुमार सानू-आशा भोसले यांच्या आवाजाची जादू

या गाण्याला कुमार सानू आणि आशा भोसले यांनी आवाज दिला होता. दोन्ही गायकांच्या आवाजातील सुंदर केमिस्ट्रीमुळे गाण्याला रोमँटिक आणि हलकाफुलका अंदाज मिळाला. नदीम-श्रवण यांनी संगीत दिलं, तर सईद राही यांनी गाण्याचे बोल लिहिले.

‘जान तेरे नाम’च्या संगीत अल्बममध्येही अनेक गाणी लोकप्रिय झाली होती. ‘अख्खा इंडिया जानता है’, ‘मैंने ये दिल तुमको दिया’ आणि ‘रोने न दीजिएगा’ यांसारख्या गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र ‘हम लाख छुपाएं प्यार मगर’ हे गाणं आजही या चित्रपटातील सर्वाधिक लक्षात राहणाऱ्या रोमँटिक गाण्यांपैकी एक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us