यशच्या ‘टॉक्सिक’मध्ये आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री, चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज, चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

यशच्या आगामी 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री. चाहत्यांना सरप्राईज देणारी ही अभिनेत्री कोण?

यशच्या टॉक्सिकमध्ये आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री, चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज, चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 23, 2026 | 12:21 PM

Toxic: A Fairy Tale for Grown-Ups : कन्नड सुपरस्टार यशच्या आगामी Toxic: A Fairy Tale for Grown-Ups या चित्रपटाबाबत सध्या चित्रपटसृष्टीत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. KGF: Chapter 2 मधील ‘रॉकी भाई’च्या भूमिकेमुळे जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवलेल्या यशचा हा चार वर्षांनंतरचा मोठ्या पडद्यावरील कमबॅक ठरणार आहे. मात्र यावेळी चर्चा केवळ यशच्या स्टाइलची नाही तर चित्रपटातील दमदार स्टारकास्टचीही आहे.

समोर आलेल्या वृत्तांनुसार, टीव्ही विश्वातून ओळख निर्माण करून अलीकडेच हीरामंडीमध्ये झळकलेली संजीदा शेख आता ‘टॉक्सिक’चा भाग बनली आहे. चित्रपटात आधीच नयनतारा आणि कियारा आडवाणी यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींची नावे निश्चित झाली होती. त्यात आता संजीदाची भर पडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजीदा या चित्रपटात स्पेशल अपीअरन्समध्ये दिसणार असली तरी तिची भूमिका कथानकाला महत्त्वाचा ट्विस्ट देणारी ठरेल. तिच्यासाठी हा पहिलाच ‘पॅन-इंडिया’ प्रोजेक्ट असल्याने करिअरमधील मोठा टप्पा मानला जात आहे.

ग्लॅमर आणि पॉवरफुल स्टारकास्ट

‘टॉक्सिक’मध्ये अभिनेत्रींची मोठी संख्या आहे. संजीदापूर्वीच हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांची नावे जाहीर झाली आहेत. या सगळ्या नावांमुळे चित्रपटाला ग्लॅमर प्लस पॉवर असा अनोखा संगम लाभला आहे. या चित्रपटाची आणखी एक मोठी खासियत म्हणजे यश यात डबल रोलमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे ‘रॉकी भाई’नंतर यश आणखी एक प्रभावी व्यक्तिरेखा साकारतो का, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

‘टॉक्सिक’ची रिलीज डेट 19 मार्च निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच दिवशी रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यात बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

संजीदाचा आगामी प्रोजेक्ट

संजीदा शेख केवळ ‘टॉक्सिक’पुरती मर्यादित नाही. ती पुढे अजय देवगनसोबत धमाल 4 या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. जो 3 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच नेटफ्लिक्सवरील Ikka या चित्रपटात ती सनी देओल आणि अक्षय खन्नासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट यशच्या कमबॅकसह दमदार स्टारकास्ट आणि मोठ्या बॉक्स ऑफिस क्लॅशमुळे सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आता प्रेक्षकांना 19 मार्चची आतुरता लागली आहे.