मोठी अपडेट! टायगरवर हल्ला झालाच नसता, थेट कपूर घरण्यातील ही व्यक्ती…
अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी हल्ला झाला. या हल्ल्यात टायगर जखमी झाला. पण टायगर हा हल्लेखोरांचा शेवटचा पर्याय होता. त्यापूर्वी त्यांनी अनेक कलाकारांच्या घराची रेखी केली होती.

मुंबईतील जुहू येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचने भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १११ (संघटित गुन्हेगारी) समाविष्ट केले आहे. या घडामोडीमुळे तपासाच्या निष्कर्षांनुसार आणि कायदेशीर निकषांची पूर्तता झाल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी अभिनेता रणबीर कपूरच्या वांद्रे येथील निवासस्थानाची आणि आमिर खानच्या खार येथील घराची रेकी केल्याचा संशय पोलिसांना आहे.
रणबीर कपूरच्या घरावर देखील हल्लेखोरांनी लक्ष ठेवले होते. त्याच्या वांद्र्याच्या पाली हिल येथील निवासस्थानाची आरोपींनी रेकी केल्याचं तपासत निष्पन्न आले. बॉलीवूडमधल्या अनेक बड्या कलाकारांच्या घरांची हल्लेखोरांनी रेकी केल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. अभिनेता सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतच रणबीर कपूरच्या घराची देखील रेखी करण्यात आली होती.
सलमान खान होता आरोपींच्या मुख्य निशाण्यावर
या टोळीच्या मुख्य निशाण्यावर सलमान खान होता. मात्र, सलमानची सुरक्षा भेदणं शक्य नसल्याचं समजताच हल्लेखोरांनी आपला मोर्चा टायगर श्रॉफकडे वळवला. रविवारी टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला.
आरोपींनी केली अनेक कलाकारांच्या घराची रेखी
लॉरेन्स बिश्नोई टोळीने शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी महिलांचा वापर केल्याचे तपासात उघड झाला आहे. या प्रकरणात टोळीने प्रथमच शस्त्रपुरवठ्यासाठी महिला कुरिअरचा वापर केल्या बाबत तपासला जात आहे. आरोपी पर्यटक असल्याचे भासवत ऑटो-रिक्शामधून बांद्रा-जुहू परिसरातील सेलिब्रिटी घरे पाहत फिरत होते. ते फोटो काढत आणि हँडलर्सना पाठवत होते. सोशल मीडिया आणि चाहत्यांच्या पोस्ट्सद्वारे त्यांना अभिनेत्यांच्या हालचालींची माहिती मिळत होती. रणबीर कपूर यांच्या घराची रेकी केल्याने पोलिसांना शंका आहे की, इतर अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या निशाण्यावर असू शकतात. या घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. टायगर श्रॉफ वर झालेल्या हल्ल्यानंतर आता रणबीर कपूरच्या नावाचा उल्लेख आल्याने उद्योगातील सर्वांना धोक्याची जाणीव झाली आहे. पोलिस या कटामधील सर्व कड्या जोडण्याच्या प्रयत्नात आहेत.