फक्त दोनच सेकंदात टायगर श्रॉफच्या गाडीवर फायरिंग, दुचाकीवरुन आलेले ते तिघे कोण?

Tiger Shroff News : एका नियोजित कटाप्रमाणे मुंबईमध्ये घटना घडली आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना जुहूमधील पुष्पापार्क परिसरात घडली आहे.

फक्त दोनच सेकंदात टायगर श्रॉफच्या गाडीवर फायरिंग, दुचाकीवरुन आलेले ते तिघे कोण?
टायगरच्या गाडीवर फायरिंग करणारे ते तिघे कोण?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 8:33 PM

मुंबईतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. जुहू येथे टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आहे. तीन अज्ञात व्यक्ती दुचाकीवर आले होते. या तिघांनी टायगर श्रॉफवर गोळीबार केला आहे. टायगर श्रॉफसोबत आणखी दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आता अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून पोलीस तपास करत आहेत. ते तिघे जण नेमके कोण आहेत? याची माहिती पोलिस शोधत आहेत.

टायगर सुरक्षित, मुंबई पोलिसांची माहिती

दरम्यान, पोलिसांनी अशीही माहिती दिली आहे की, टायगर श्रॉफ हा सुरक्षित आहे. जुहूतील पुष्पा पार्क येथे ही घटना घडली आहे. टायगर त्याठिकाणी फुटबॉल सामना खेळायला गेला होता, त्यावेळी ही घटना घडली आहे. तिनही व्यक्ती या दुचाकीवरुन आल्या होत्या त्यांनी अचानकपणे गोळीबार सुरु केला. पण सुदैवाची बाब म्हणजे या गोळीबारामध्ये अभिनेता टायगर श्रॉफ हा थोडक्यात बचावला आहे. यावेळी टायगरसोबत त्याचा चालक होता. त्याशिवाय याठिकाणी एक रिक्षाचालकही होता, अशी सुरुवातीला माहिती समोर आली होती. पण आता टायगर सुरक्षित असल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनाीी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Loading...

दोघेजण जखमी

पण असं असलं तरी याप्रकरणी दोघेजण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणावरुन आता सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. पुष्पा पार्कमध्ये टायगरभोवती चाहत्यांनी गराडा घातला होता. तो नेमका निघणार त्याचवेळी ही घटना घडली आहे. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी धडपड करत होते. त्याचवेळी एकाचा कॅमेरा ऑन होता. त्यादरम्यानच अचानक गोळीबाराचा आवाज आला. एकच खळबळ आणि गोंधळ उडाला, सगळेजण सैरावैरा धावत सुटले. गोळीबारानंतर घबराटीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली

दरम्यान, टायगरवर हल्ला करणारे तिघेजण हे लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची शक्यता आहे. कारण या गोळीबाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन यासंबंधीची जबाबदारी स्वीकारली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us