Tiger Shroff: हल्ला टायगरवर पण पोलिसांना चिंता सलमान खानची, भाईजानसाठी उचललं मोठं पाऊल
Tiger Shroff Firing Update: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर काही लोकांनी काल जुहू परिसरात अचानक हल्ला केला. आता यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

Tiger Shroff Firing: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर काही लोकांनी काल जुहू परिसरात अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी अभिनेत्यावर धाड धाड गोळ्या झाडल्या. टायगर हा त्याच्या गाडीत होता त्यावेळी काही मुलांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो किरकोळ जखमी झाला असला तरी, तो सध्या सुरक्षित आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफचा चालक आणि जवळच असलेला एक ऑटो-रिक्षा चालक जखमी झाले. आता यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
हल्लेखोरांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी गोळीबारात वापरलेली बाईक जप्त केली आहे. बाईकच्या नंबर प्लेटवरून गुन्हेगारांची माहिती मिळवली जात आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडिया पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आहे. आता यानंतर पोलिसांनी वांद्रे येथील बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सुरक्षाही वाढवली आहे. वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरात बुलेटप्रूफ जॅकेट घातलेले पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अनेक पोलीस वाहनेही उपस्थित आहेत. यापूर्वीही बिश्नोई टोळीकडून सलमान खानला धमकी देण्यात आली होती.
पोलिसांनी सांगितले की टायगर श्रॉफला कोणतीही इजा झालेली नाही. त्याचा चालक, फिरदौस, याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. ऑटोचालक, चौहानही जखमी झाला आहे. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या धोक्याबाहेर आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यासंदर्भात पोलीस आयुक्त आणि टायगर श्रॉफ यांच्याशी संवाद साधला. त्यांनी तातडीने अटक आणि कठोर कारवाईचे आश्वासन दिले. एकनाथ शिंदे यांनीही टायगरची भेट घेतली. पोलिसांनी सांगितले की, ही घटना जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पा पार्कजवळ घडली. अज्ञात व्यक्तींनी अभिनेत्यावर गोळ्या झाडल्या. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गोळीबार होण्यापूर्वी टायगर फुटबॉल खेळायला गेला होता. तिथे तो त्याने त्याच्या चाहत्यांसाठी गप्पाही मारल्या. एका चाहतीने त्याच्यासोबत फोटोही काढला यानंतर गाटी गेटच्या बाहेर आली आणि पुढे त्याच्या गोळीबार झाला.