AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff : हल्ला झाल्यानंतर टायगर श्रॉफने घेतला मोठा निर्णय, थेट मुंबईतील आलिशान घरच विकले

कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफच्या नव्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टी डीलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. टायगरने मुंबईतील आपलं आलिशान अपार्टमेंट विकलं आहे. गोळीबाराच्या काही दिवसांनंतर टायगरच्या घराच्या विक्रिची बातमी समोर आल्याने या व्यवहाराकडे लक्ष वेधलं गेलं आहे

Tiger Shroff : हल्ला झाल्यानंतर टायगर श्रॉफने घेतला मोठा निर्णय, थेट मुंबईतील आलिशान घरच विकले
TIGER SHROFF HOME IN MUMBAI KHARImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 24, 2026 | 8:18 PM
Share

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारजवळ मुंबईत गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर आता टायगरच्या एका मोठ्या प्रॉप्रर्टी डीलची चर्चा सुरू झाली आहे. टायगरने मुंबईतील खार पश्चिम परिसरातील आपलं आलिशान अपार्टमेंट तब्बल 9 कोटी रूपयांना विकलं आहे.

रिअल इस्टेट डेटा विश्लेषण करणाऱ्या सीआरई मॅक्ट्रिक्सच्या माहितीनुसार, या व्यवहाराची नोंदणी 22 ऑक्टोबर 2026 रोजी झाली. टायगरचं हे अपार्टमेंट खार पश्चिम येथील रूस्तमजी पॅरामाऊंट डी को – ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या 9 मजल्यावर आहे. तसेच या घराच क्षेत्रफळ 1,291.14 चौरस फूट आहे.

टायगरने 2018 मध्ये हे अपार्टमेंट बिल्डरकडून 7.61 कोटी रूपयांना खरेदी केलं होतं. आता त्याची विक्री 9 कोटी रूपयांना झाली आहे. म्हणजेच खरेदीच्या किमतीच्या तुलनेत विक्रिची किंमत सुमारे 1.39 कोटी रूपयांनी जास्त आहे.

याआधीही टायगरने प्रॉपर्टी विकली होती. 2025 मध्ये त्याने याच इमारतीतील दुसरं अपार्टमेंट 15.6 कोटी रूपयांना विकलं होतं. तर 2026 च्या सुरूवातीला पुण्यातील हडपसर परिसरातील मालमत्तेची 8.87 कोटी रूपयांना विक्री केली होती.

दरम्यान 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरातील टायगरच्या कारजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली होती. तो फुटबॉल खेळून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत टायगर सुरक्षित राहिला, तर त्याचा चालक आणि एक व्यक्ती जखमी झाले.  गोळीबाराच्या काही दिवसांनंतर टायगरच्या घराच्या विक्रिची बातमी समोर आल्याने या व्यवहाराकडे लक्ष वेधलं गेलं आहे. मात्र घर विकण्याचा निर्णय आणि गोळीबाराची घटना यांचा परस्पर संबंध नाही.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...