मुंबईची हाय प्रोफाईल पार्टी असते तरी कशी? बायको, गर्लफ्रेंड्सची आदला – बदली, शारीरिक संबंध अन्…, अभिनेत्रीचा शॉकिंग दावा

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीने शॉकिंग दावा केला आहे. अभिनेत्रीने मुंबई होणाऱ्या हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये ड्रग्सचं सेवन केलं जातं. तर बायको, गर्लफ्रेंड्सची आदला - बदली, शारीरिक संबंध अन्... अभिनेत्रीच्या दाव्याची सर्वत्र चर्चा.

मुंबईची हाय प्रोफाईल पार्टी असते तरी कशी? बायको, गर्लफ्रेंड्सची आदला - बदली, शारीरिक संबंध अन्..., अभिनेत्रीचा शॉकिंग दावा
अभिनेत्री आचल खुराना
| Updated on: Aug 21, 2026 | 2:54 PM

टीव्ही अभिनेत्री आचल खुराना हिने मुंबईच्या पार्ट्यांबद्दल मोठा दावा केला आहे. ज्यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री स्पष्ट सांगितलं आहे की, आचल हिला मुंबई पार्टीसाठी योग्य वाटत नाही. त्यामुळे अभिनेत्री कायम अशा हाय – प्रोफाईल पार्ट्यांपासून स्वतःला लांब ठेवते. सांगायचं झालं तर, एका मुलाखतीत आचल हिने मुंबईच्या हाय प्रोफाईल पार्ट्यांची पोलखोल केली आहे. अभिनेत्रीने असा दावा केला की, सिनेसृष्टीतील काही पार्ट्यांमध्ये अमली पदार्थ, ‘कास्टिंग काउच’ आणि जोडीदार बदलणे (पार्टनर-स्वॅपिंग) यांसारख्या गोष्टी घडतात.

पार्ट्यांमध्ये कायम होतं ड्रग्सचं सेवन

एका मुलाखतीत आचंलने मुंबई होणाऱ्या पार्ट्यांची पोलखोल केली आहे. ‘गेल्या 10 – 15 वर्षांपासून जेव्हा माझी पार्टी करण्याची इच्छा होते, तेव्हा मी माझ्या भावंडांकडे किंवा माझ्या कुटुंबियांकडे जाते. मुंबईत पार्टी करण्याऐवजी मला माझ्या कुटुंबियांसोबत वेळ व्यतीत करायला अधिक आवडेल. कुटुंबियांसोबत मला चिल करायला ड्रिंक करायला आवडतं.’ अभिनेत्रीने सांगितलं की, मुंबईत तिने कधीच फारसे मित्र बनवले नाहीत, कारण येथील ‘पार्टी कल्चर’ आचलला भयंकर वाटतं.

मुंबईतील ग्लॅमरस मनोरंजन क्षेत्रातील जीवनशैली आणि पार्ट्यांबाबतच्या अनुभवांच्या आधारे आचलने अनेक गंभीर दावे केले आहेत. अभिनेत्रीने सांगितलं, अशा पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर केला जातो आणि ‘कास्टिंग काउच’सारखे प्रकारही घडतात. आचल हिने असाही दावा केला की, काही पार्ट्यांमध्ये पत्नी किंवा प्रेयसींची अदलाबदल देखील केली जाते. मात्र, आचलने हेही स्पष्ट केलं की, असं करण्यासाठी कोणावर दबाव नसतो, सर्वकाही प्रत्येकांच्या इच्छेने होत असतं.

पुढे आचल असं देखील म्हणाली की, सोशल मीडियावर आपल्या लग्नाबाबत आणि नातेसंबंधांबाबत ‘कपल गोल्स’ देणारे काही सेलिहब्रिटी कपल्स खरं तर त्यांच्या जोडीदाराची फसवणूक देखील करत असतात. त्यामुळे मला अशा नकारात्मकतेपासून दूर राहायला आवडतं… पडद्यामागे या सेलिब्रिटींचं आयुष्य फार वेगळे असतं… असं देखील आचल म्हणाली.

अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर, आचल खुराना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील  फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us