कोण आहे नितीन गडकरी यांची आवडती अभिनेत्री? मोठा खुलासा, आलिया, दीपिका, कतरिना सोडा, थेट…

नितीन गडकरी हे देशातील राजकारणातील मोठे नाव आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक असून भाजपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. नुकताच फराह खान ही नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचली होती.

कोण आहे नितीन गडकरी यांची आवडती अभिनेत्री? मोठा खुलासा, आलिया, दीपिका, कतरिना सोडा, थेट...
Union Minister Nitin Gadkari
| Updated on: Jan 03, 2026 | 12:02 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणात अत्यंत मोठा काळ घालवला आहे. नितीन गडकरी हे मूळ नागपूरचे असून ते भाजपाचे केंद्रीय मंत्री असून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. नुकताच फराह खान ही नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी पोहोचली होती. यावेळी फराह खान हिचा स्वयंपाकी अर्थात दिलीप हा देखील होता. फराह खान हिने काही वर्षांपूर्वी ब्लॉगिंग करण्यात सुरूवात केली असून फराह खानचे एक युट्युब चॅनल देखील आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये फराह खान ब्लॉगिंगमुळे खूप जास्त प्रसिद्ध झाली. फराह खान वेगवेगळ्या सेलिब्रिटी लोकांच्या घरी जाते आणि तिथे फराह खानया स्वयंपाकी जेवण तयार करतो. विशेष म्हणजे आपल्या आवडत्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे घर बघण्याची एक मोठी संधी लोकांना मिळत आहे.

पहिल्यांदाच फराह खान ही कोणत्यातरी राजकीय व्यक्तीच्या घरी केली. फराह खान हिने मनसोक्त गप्पा नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नीसोबत मारल्या. शिवाय चमचमकीत खाद्यपदार्थही बनवले. फराह खान दिल्लीत येत असल्याने नितीन गडकरी यांच्या पत्नीही फराह खानला भेटण्यासाठी नागपूरहून दिल्लीत दाखल झाल्या. फराह खानच्या ब्लॉगमध्ये नितीन गडकरी यांचे शासकीय निवासस्थान पूर्ण बघण्याची संधी लोकांना मिळाली.

यावेळी फराह खान हिने नितीन गडकरी यांना मोठा प्रश्न विचारत म्हटले की, तुम्ही चित्रपट बघता? यावर उत्तर देत गडकरी यांनी म्हटले हो… आमच्या घरी थिएटर आहे… ओम शांती ओम चित्रपट बघितल्याचेही त्यांनी सांगितले. आवडला अभिनेता कोण आहे? यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी थेट अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले. त्यांनी म्हटले की, अमिताभ बच्चन माझे आवडते अभिनेते आहेत.

पुढे फराह खान हिने विचारले की, अभिनेत्री कोणती आवडते तुम्हाला? यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी म्हटले की,  रजनीगंधामध्ये जी अभिनेत्री होती ना.. विद्या सिन्हा ती मला खूप जास्त आवडत.. गडकरी पुढे म्हणाले, पण आता ती या जगात नाहीये… यावर फराह खान म्हणाली की, बहुतेक आहे.. नितीन गडकरी म्हणाले नाही नाही… मला स्मृति ईरानीने सांगितले होते नाहीये म्हणून.. विद्या सिन्हा यांनी छोटी सी बात, पती पत्नी आैर ओ अशा काही चित्रपटात काम केले.