मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी स्वयंपाकी दिलीपसोबत पोहोचली फराह खान, गडकरी यांचे बोलणे ऐकून फराहला मोठा धक्का, थेट..
फराह खान मागील काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या यूट्यूब ब्लॉगिंगमध्ये चर्चेत आहे. अनेक प्रसिद्ध लोकांच्या घरी फराह आणि तिचा स्वयंपाकी जातात. आता थेट नितीन गडकरी यांच्या घरी फराह खान आणि दिलीप पोहोचले आहेत.

फराह खान म्हटले की, आपल्याला फक्त आणि फक्त बॉलिवूड चित्रपट आठवतात. मात्र, आता चित्रपटांसोबतच फराह खान यूट्यूब ब्लॉगिंगमध्ये उतरली आहे. विशेष म्हणजे फराह खान धमाका करताना दिसत आहे. फराह खानच्या ब्लॉगिंगला चाहत्यांचे मोठे प्रेम मिळतंय. मोठं मोठ्या कलाकारांच्या घरी जाऊन फराह खान आणि तिचा स्वयंपाकी दिलीप जेवण बनवतात. विशेष म्हणजे मनिष मल्होत्रा, बोनी कपूर, जॉकी श्रॉफ, रवीना टंडन, सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा, अॉरी, अनन्या पांडे अशा असंख्य कलाकारांच्या आणि प्रसिद्ध लोकांच्या घरी जाऊन दिलीप जेवण तयार करतो. विशेष म्हणजे फराह खानचा स्वयंपाकी दिलीप याची जबरदस्त फॅन फॉलोइंग वाढली असून त्यालाही जाहिराती मिळत आहेत. फराह खान कुठेही गेली की, अगोदर दिलीप कुठे आहे असे विचारले जाते.
चाहत्यांना फराह खान आणि दिलीप यांच्यातील मस्करी आणि स्वयंपाकाची शैली खूप आवडते. फराह खानने दीड वर्षांपूर्वी तिचे यूट्यूब चॅनल लाँच केले आणि व्लॉग तयार करण्यास सुरुवात केली. आता फराह खान आणि दिलीप थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचले. नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानात हे पोहोचले. अजून याचा पूर्ण व्लॉग येणे बाकी आहे. मात्र, नितीन गडकरी यांच्या घरी मस्त धमाल यांनी केली.
नितीन गडकरी यांच्या घरी दिलीप याने खास पदार्थ बनवल्याचे सांगितले जाते. अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीचे वडे तयार करण्यात आली. यासोबतच दिलीप सातत्याने गावचा रस्ता बनवून देण्याची मागणी गडकरी यांच्याकडे करत होता. यादरम्यान नितीन गडकरी यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. नितीन गडकरी यांच्या शासकीय निवासस्थानाची आणि त्यांच्या स्वयंपाक घराची झलक लोकांना बघायला मिळाली. नितीन गडकरी यांनी भेटून फराह खान आणि दिलीप चांगलेच आनंदी झाले.
यावेळी नितीन गडकरी यांनी फराह खानला सांगितले की, ते रात्री 9.30 वाजता झोपतात आणि सकाळी 7 ला उठून व्यायाम करतात. हेच नाही तर 135 किलो वजन आता त्यांनी कमी करून 89 केल्याचेही त्यांनी यादरम्यान फराह खानला सांगितले. नितीन गडकरी यांचे बोलणे ऐकून गडकरी यांना धक्का बसला. दिलीपला गडकरी यांनी विचारले की, तुझे गाव कोणते आहे… दिलीप म्हणाला बिहार… त्यावर गडकरी यांनी म्हटले की, मी बिहारमध्ये खूप जास्त रस्ते बनवले आहेत. यावेळी दिलीप त्याच्या गावातील छोट्या रस्त्याबद्दल बोलताना दिसला. यावर गडकरी म्हणाले की, मी मोठे महामार्ग बनवतो..
