AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फराह खान युट्यूबवरून करते तब्बल इतकी कमाई, दिलीपचे फेडले कर्ज, चित्रपटांपेक्षा कितीतरी पट…

फराह खान मागील काही दिवसांपासून तिच्या ब्लॉगिंगमुळे तूफान चर्चेत आहे. अनेक व्हिडीओ तिचे व्हायरल होताना दिसते. मोठ्या कलाकारांच्या घरी ती दिलीपला घेऊन जाते आणि तिथे खास जेवण तयार केले जाते.

फराह खान युट्यूबवरून करते तब्बल इतकी कमाई, दिलीपचे फेडले कर्ज, चित्रपटांपेक्षा कितीतरी पट...
Farah Khan and Dilip
| Updated on: Nov 22, 2025 | 9:33 AM
Share

फराह खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. यूट्यूब ब्लॉगिंगमध्ये ती चांगलीच व्यस्त दिसत आहे. तिचा कूक दिलीपसोबतचे तिचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होताना दिसतात. चाहत्यांना त्यांची मस्करी आणि स्वयंपाकाची शैली खूप आवडते. विशेष म्हणजे मोठं मोठ्या कलाकारांच्या घरी जाऊन फराह खान आणि दिलीप जेवण बनवतात. फराह खानने दीड वर्षांपूर्वी तिचे यूट्यूब चॅनल लाँच केले आणि व्लॉग तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला फराह एकटी व्लॉग तयार करायची, तिच्या स्वयंपाकी दिलीपलाही तिच्या व्लॉगमध्ये दिसण्यास सुरूवात झाली. आज तिचे यूट्यूबवर 25 लाख सबस्क्राइबर आहेत. यातून तगडा पैसा फराह खान कमावते. फराहने एका पॉडकास्टमध्ये YouTube ब्लॉगिंगमधून मिळालेल्या कमाईचा खुलासा केला आहे.

फराह खान म्हणाली की, मी खूप जास्त पैसे कमावत आहे. इतके चित्रपट दिग्दर्शित करूनही, मी एकाच वर्षात कदाचित माझ्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही इतके पैसे कमवले नाहीत. फराह खान हिच्यासोबत तिच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये दिसणारा तिचा कूक दिलीप यालाही मोठे पैसे देते. यासोबतच फराह खानने दिलीपचे सर्व कर्जही फेडून टाकले आहे. कारण या चॅनलमध्ये जितके फराह खानचे योगदान आहे, तितकेच दिलीपचे देखील.

फराह खानने स्पष्ट केले की, ती दिलीपचे जीवन सुधारत आहे आणि तो चांगला उदरनिर्वाह करत आहे. मी आता त्याच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवते. मी त्याच्या एका मुलाला स्वयंपाक कौशल्याच्या डिप्लोमा कोर्समध्येही प्रवेश दिला. हेच नाही तर दिलीपवर खूप जास्त कर्ज होते. ते फेडण्यासाठी आमचे एक वर्ष गेले. हेच नाही तर त्याच्या गावाकडे दिलीपचे चांगले मोठे घर बनत आहे.

हेच नाही तर दिलीपला जास्त पैसा मिळाला, याकरिता मी त्याला अनेक ब्रँडना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच फराह खानच्या चॅनलवरून दिलीप हा आपले गावाकडचे घर दाखवताना देखील दिसला होता. आतापर्यंत अनेक मोठं मोठ्या व्यक्तींच्या घरी जाऊन दिलीपने पदार्थ बनवली. दिलीपला एक वेगळी ओळख फराह खानमुळे नक्कीच मिळाली आहे. तो काही जाहिराती देखील करतो.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.