AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vandana Gupte : मी त्यांचा हात हातात घेतला, त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं…वंदना गुप्तेंनी सांगितला डॉ. श्रीराम लागू यांचा नाटकादरम्यानचा प्रसंग

Vandana Gupte : वंदना गुप्ते यांनी एका मुलाखतीत डॉ. श्रीराम लागू यांचा 'सुंदर मी होणार' या नाटकादरम्यानचा प्रसंग सांगितला आहे.

Vandana Gupte : मी त्यांचा हात हातात घेतला, त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं...वंदना गुप्तेंनी सांगितला डॉ. श्रीराम लागू यांचा नाटकादरम्यानचा प्रसंग
| Updated on: Oct 04, 2026 | 3:51 PM
Share

वंदना गुप्ते यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत नाटकामध्ये काम केलं आहे. अनेक मुलाखतींमध्ये वंदना यांनी डॉ. लागू यांचे किस्से सांगितले आहेत. अशातच आता एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी ‘सुंदर मी होणार‘ या नाटकादरम्यानचा भावुक किस्सा सांगितला आहे. नाटकाचा प्रयोग सुरू असताना काही प्रेक्षकांचा मध्येच फोन वाजतो, त्यामुळे काही कलाकार नाटक मध्येच थांबवतात आणि प्रेक्षकांना सुनावतात. याबद्दल वंदना गुप्ते यांनी सांगितलं की, आजकालचे अभिनेते नाटक मध्येच थांबवतात, हे अत्यंत चुकीचं आहे. यासंदर्भातच वंदना यांनी डॉ. श्रीराम लागू यांचा किस्सा सांगितलाय.

वंदना गुप्तेंनी सांगितला प्रसंग

वंदना गुप्ते यांनी सांगितलं की, ‘सुंदर मी होणार‘ हे नाटक सुरू असतानाच श्रीराम लागू यांच्या मुलाचं अपघाती निधन झालं. मुलाच्या निधनानंतर अवघ्या दहा दिवसांमध्ये श्रीराम लागू यांनी नाटकाचे प्रयोग सुरू केले. मुलाच्या निधनानंतर वंदना यांचा पहिलाच प्रयोग होता. नाटकाचा प्रयोग सुरू असताना डॉ. लागू 10 सेकेंदासाठी शांत झाले, ते ब्लँक झालेले. मुलांविषयीची ती वाक्ये होती. प्रेक्षकांनाही नेमकं काय झालं ते समजलं होतं, त्यांनाही जाणीव झाली होती की, डॉक्टर आपल्या मुलाच्या आठवणीत हरवले आहेत. मी त्यांच्या बाजूलाच होते. मी त्यांचा हात हातात घेतला, त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं आणि प्रयोग पूर्ण केला. पण मध्यंतराच्या वेळी डॉ. लागू यांनी जे केलं, त्यानं सगळेच भारावले.’

‘डॉ. लागू यांनी मध्यांतरात आम्हा सर्व कलाकारांना मध्यभागी उभं केलं आणि लोटांगण घातलं. लागू म्हणाले, ‘माझ्याकडून आज अक्षम्य गुन्हा घडला आहे. मी नाटकाच्या बाहेरच्या गोष्टीचा विचार स्टेजवर केला आणि ब्लँक झालो. मला तुम्हा सर्वांची माफी मागायची आहे.” असा भावुक प्रसंग वंदना यांनी सांगितलाय. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन‘ला दिलेल्या मुलाखतीत वंदना गुप्ते बोलत होत्या. कला आणि कामाप्रती असलेली निष्ठा काय असते, हे आम्हाली त्यादिवशी समजलं असंही वंदना गुप्ते म्हणाल्या.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात