AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुण-नताशाचा आज लग्नाचा वाढदिवस, शर्टलेस होत क्लिक केला रोमांटिक फोटो

वरुन धवन आणि नताशा यांच्या लग्नाचा आज तिसरा वाढदिवस आहे. दोघांनी २०२१ मध्ये विवाह केला होता. नताशाला तीन ते चार वेळेस नताशाला प्रपोज केले होते. पण तिने त्याला नकार दिला होता. पण अखेर वरुनला यश मिळालेच. नताशा ही त्याची वर्ग मैत्रिण होती. शाळेपासून दोघं एकत्र होते. पण वरुन नंतर तिच्या प्रेमात पडला.

वरुण-नताशाचा आज लग्नाचा वाढदिवस, शर्टलेस होत क्लिक केला रोमांटिक फोटो
| Updated on: Jan 24, 2024 | 6:21 PM
Share

Varun Dhawan Wedding Anniversary : ​​वरूण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाला आज तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. बॉलिवूडचे हे कपल आता चौथ्या वर्षात पदार्पण करत आहेत. आजच्याच दिवशी वरुण धवन आणि नताशा यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या लग्नाच्या तिसऱ्या वर्षी अभिनेत्याने खास फोटोसह पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.

वरुणने नॉन फिल्मी असलेल्या नताशा सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. कुटुंब आणि अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत दोघांनी 2021 मध्ये विवाह केला होता. आपल्या वाढदिवसाच्या तिसऱ्या वर्षी वरुणने नताशाला प्रपोज करतानाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

वरुणने शर्टलेस फोटो केला शेअर

वरुण धवनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो शर्टलेस दिसत आहे, तर नताशाने मोनोकिनी आणि खाली पांढरा स्कर्ट घातला आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने ‘हॅपी 3rd बेबी’ असे लिहिले आहे. मी तुला प्रपोज केले तेव्हा मार्को अँटोनियोचे गाणे वाजत होते.

या फोटोवर चाहते देखील प्रतिक्रिया देत आहेत. या रोमँटिक फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. चाहते दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

रुण धवनने करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये नताशासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. वरुणने सांगितले होते की, त्याची आणि नताशाची पहिली भेट सहावीत असताना झाली होती. मात्र, तेव्हा ते फक्त चांगले मित्र होते. साधारण 11वी आणि 12वी पर्यंत. वरुणने सांगितले की, कालांतराने त्याला कळले की तो नताशावर प्रेम करू लागला आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुणने शाळेत बास्केटबॉल खेळायचा. तो शाळेत यलो हाऊसमध्ये होता आणि नताशा रेड हाऊसमध्ये होती. जेवणाच्या सुट्टीत जेव्हा ती त्याला समोरुन येताना दिसली तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता. वरुणने असेही सांगितले होते की, नताशाने 3-4 वेळा प्रपोज केल्यानंतर त्याला नाकारले होते. पण त्याने हार मानली नाही आणि अखेर ती तयार झाली.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.