Video | मुकेश अंबानी यांनी मुलाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सर्वसामान्यांप्रमाणे चवीने केले जेवण, Video झाला व्हायरल

| Updated on: Feb 29, 2024 | 10:06 AM

Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding | अन्नदान कार्यक्रमात राधिका आणि अनंत यांना गावकऱ्यांकडून खूप आशीर्वाद मिळाले. लोकांनी त्याला भेटवस्तूही दिल्या. त्याचवेळी अनंत आणि राधिका यांनीही सर्वांचे मोकळेपणाने स्वागत केले. हात जोडून प्रणाम केला आणि स्वतःच्या हाताने जेवणही दिले.

Video | मुकेश अंबानी यांनी मुलाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सर्वसामान्यांप्रमाणे चवीने केले जेवण,  Video झाला व्हायरल
अनंत अंबानी यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग कार्यक्रम सुरु झाले.
Follow us on

नवी दिल्ली | दि. 29 फेब्रुवारी 2024 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचा लग्नपूर्वीचा समारंभ सुरु झाला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. अनंत अंबानी यांचे लग्न एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्यासोबत होणार आहे. त्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात अंबानी परिवाराचा होम टाऊन जामनगरमधून झाली. या ठिकाणी 51 हजार जणांना अन्नदान दिले जाणार आहे. प्री-वेडिंग कार्यक्रम 3 मार्चपर्यंत चालणार असून त्यात जगभरातील दिग्गज हजेरी लावणार आहे. दरम्यान मुकेश अंबानी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात मुकेश अंबानी चवीने जेवण करत असून गाववाल्यांशी चर्चा करत आहेत.

सर्वसामान्यांप्रमाणे केले जेवण

सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. त्यात मुकेश अंबानी स्वाद घेऊन जेवण करताना दिसत आहेत. खाद्यपदार्थ हातात घेऊन गावकऱ्यांमध्ये मिसळून मुकेश अंबानी जेवण करत आहेत. मुकेश अंबानी यांच्यासाठी मुलाच्या लग्ना पूर्वीच्या कार्यक्रमाची हे क्षण विशेष राहिलेली दिसत आहेत. जेवण करताना त्यांच्या गप्पाही रंगल्या आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर युजर्सच्या प्रतिक्रिया पडू लागल्या आहेत. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतानाही त्यांचे पाय जमिनीवरच असल्याचे युजर्स म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा

या समारंभात मुकेश अंबानीही उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमातील उपस्थितांशी संवाद साधला, त्यांना आग्रह करून, हसतमुखाने जेवणही वाढलं.

राधिका आणि अनंत यांना घेतले गावकऱ्यांचे आशीर्वाद

अन्नदान कार्यक्रमात राधिका आणि अनंत यांना गावकऱ्यांकडून खूप आशीर्वाद मिळाले. लोकांनी त्याला भेटवस्तूही दिल्या. त्याचवेळी अनंत आणि राधिका यांनीही सर्वांचे मोकळेपणाने स्वागत केले. हात जोडून प्रणाम केला आणि स्वतःच्या हाताने जेवणही दिले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अंबानी कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या अन्नदान कार्यक्रमामध्ये ५१ हजार स्थानिक लोकांना जेवण दिले जाणार आहे. त्यात गुजराती पदार्थ असतील. हे आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. अण्णा सेवेच्या पहिल्या दिवशी भोजनानंतर उपस्थितांनी पारंपरिक लोकसंगीताचा आस्वाद घेतला. प्रसिद्ध गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांनी आपल्या गायनाने लोकांचे मनोरंजन केले.

हे ही वाचा

अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगला जगभरातून दिग्गज, बॉलिवूड सिलेब्रटीज, अब्जाधिश होणार सहभागी