Vivek Oberoi: रोहित शेट्टीच्या Indian Police Force मध्ये विवेक ओबेरॉयची धमाकेदार एण्ट्री; पहा फर्स्ट लूक
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंतर आता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) वेब सीरिजमध्ये एण्ट्री केली आहे. 'इंडियन पोलीस फोर्स' (Indian Police Force) असं या सीरिजचं नाव असून गेल्या काही दिवसांपासून यातील कलाकारांचे लूक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंतर आता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) वेब सीरिजमध्ये एण्ट्री केली आहे. ‘इंडियन पोलीस फोर्स’ (Indian Police Force) असं या सीरिजचं नाव असून गेल्या काही दिवसांपासून यातील कलाकारांचे लूक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आत विवेक ऑबेरॉयचा अॅक्शन मोडमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. खाकी वर्दी आणि हातात गन असलेल्या विवेकचा हा लूक नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. याआधी सिद्धार्थ आणि शिल्पाचा लूक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. त्यालासुद्धा प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला.
‘इंडियन पोलीस फोर्स: या सर्वांत बेस्ट फोर्समध्ये जॉईन होतोय. या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल रोहित शेट्टी तुझे आभार’, असं कॅप्शन देत विवेकने इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘बऱ्याच वर्षांनी तुला चांगली भूमिका मिळाली’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘तुला पुन्हा अॅक्शन मोडमध्ये पाहून खूप चांगलं वाटतंय’ असं दुसऱ्याने म्हटलं. ‘तुला ऑनस्क्रीन पाहण्याची खूप उत्सुकता आहे’, असंही एका नेटकऱ्याने लिहिलंय.
पहा फर्स्ट लूक-
“इंडियन पोलीस फोर्स ही सीरिज माझ्यासाठी खूप खास आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी त्यावर काम करतोय. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने यात माझी मदत केली. ही सीरिज नवीन बेंचमार्क स्थापित करेल असा मला पूर्ण विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.