जेव्हा ग्राहक थेट अंबानींना विचारतो, “सर, जिओ चालत नाही”

मुंबई : 1 डिसेंबरला मुंबईच्या ग्रॅण्ड हयातमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचं रिसेप्शन मोठ्या थाटामाटात पार पडलं. यावेळी बॉलीवूड आणि व्यावसायिक जगातील बड्या मंडळींनी या रिसेप्शनला हजेरी लावली. रेखा, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सैफ अली खान, करिना कपूर, विद्या बालन, माधुरी दिक्षीत यांसारखे अनेक स्टार्स दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये आले होते. यांपैकीच एक होतं अंबानी कुटुंब. …

जेव्हा ग्राहक थेट अंबानींना विचारतो, “सर, जिओ चालत नाही”

मुंबई : 1 डिसेंबरला मुंबईच्या ग्रॅण्ड हयातमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचं रिसेप्शन मोठ्या थाटामाटात पार पडलं. यावेळी बॉलीवूड आणि व्यावसायिक जगातील बड्या मंडळींनी या रिसेप्शनला हजेरी लावली. रेखा, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सैफ अली खान, करिना कपूर, विद्या बालन, माधुरी दिक्षीत यांसारखे अनेक स्टार्स दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये आले होते. यांपैकीच एक होतं अंबानी कुटुंब. पण अंबानी कुटुंबासोबत या रिसेप्शनमध्ये असं काही घडलं ज्याचा कुणीही विचार केला नव्हता. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.

हा व्हिडीओ ग्रॅण्ड हयातचा आहे, जिथे मुकेश अंबानी हे आपल्या कुटुंबासोबत गेले होते. ते माध्यमांना फोटोसाठी पोज देत होते. तेवढ्यात एक व्यक्ती म्हणाला की, “सर, जिओ चालत नाही.” त्यानंतर इतर फोटोग्राफर्सही हेच म्हणू लागले. पण मुकेश अंबानीने याकडे कानाडोळा केला आणि तेथून निघून गेले.


ट्विटरवर साहिल रीजवान नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला. ज्यावर अनेकांनी मजेशीर रिप्लाय दिले.

दीपिका आणि रणवीरचं इटलीत लग्न झाल्यानंतर भारतातलं हे दुसरं रिसेप्शन होतं. पहिलं रिसेप्शन 21 नोव्हेंबरला बंगळुरुत झालं, तर 28 नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन झालं.

दीपिका आणि रणवीरने 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीतील प्रसिद्ध लेक कोमो इथे लग्न केलं. दीपिका दक्षिण भारतीय असल्यामुळे 14 तारखेला कोंकणी पद्धतीने, तर 15 तारखेला सिंधी पद्धतीने शाही विवाह सोहळा झाला.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचं वारं वाहत असतानाच देसी गर्ल प्रियांचा चोप्राही नीक जॉनससोबत विवाहबंधनात अडकली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *