बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्डच्या शिरकावाची ती कहानी, जेव्हा अमिताभ-दिलीप कुमार यांच्या निर्मात्याचे वरळीतून झाले होते अपहरण

१८ ऑक्टोबर २०२६ रोजी रविवारी सायंकाली अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गुंडांनी गोळीबार केला. त्यावेळी ८० - ९० च्या दशकातील बॉलीवूडवरील अंडरवर्ल्डच्या वर्चस्वाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्डच्या शिरकावाची ती कहानी, जेव्हा अमिताभ-दिलीप कुमार यांच्या निर्मात्याचे वरळीतून झाले होते अपहरण
Producer of the Amitabh and Dilip Kumar-starrer 'Shakti' kidnapped from Worli
| Updated on: Oct 19, 2026 | 11:47 PM

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर रविवारी जुहूत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्डची दहशत पसरली आहे. मात्र ८०-९० च्या दशकात बॉलीवूडच्या कलाकारांना मिळणाऱ्या अशाच प्रकारच्या धमक्या आणि खंडण्यांचे सत्र सुरु झाले होते. एकीकडे अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांचा चित्रपट शक्ती रिलीज होण्याची तयारी सुरु होती. दुसरीकडे चित्रपट निर्माते मुशील आलम यांच्या खाजगी जीवनात वादळ येणार होते. पांढऱ्या एंबेसेडर कार, वरळीतील वर्दळीचा चौक, हत्यारबंद गुंड आणि २० लाखाची खंडणी. २० लाख त्याकाळात जास्त होते. ४५ वर्षांपूर्वी ही रक्कम कोट्यवधी रुपयात बसत होती.

किडनॅपर्सना अंदाज नव्हता की त्यांची शिकार डोळ्याला पट्टी बांधली असली तरी त्यांच्या विरोधात पुरावे जमा करत होती. अखेर मुशीर आलम यांचे अपहरण एम्बेसेडरमधून उतरलेल्या तिघा गुंडांनी केले. निर्मात्याच्या अपहरणाचा हा किस्सा ‘डोंगरी से दुबई तक या पुस्तकात हुसैन झैदी यांनी लिहिला आहे. हे पुस्तक दाऊदच्या काळ्या साम्राज्यावर बेतलेले आहे. बॉलीवूडमध्ये हे अपहरण अंडरवर्ल्डची घुसखोरी होते. नंतर अंडरवर्ल्डमधून दाऊद आणि राजन तसेच अन्य गँगस्टरची दहशत कमी करण्यासाठी पोलीसांनी एन्काऊंटरचे अस्र उपसले होते.

Loading...

त्याकाळी पठाण गँग, दाऊद इब्राहिमची डी-कंपनी आणि त्याच्या संलग्न अन्य टोळ्या सक्रीय होत्या. आता टायगरवर जो गोळीबार केला आहे त्याची जबाबदारी नव्या लॉरेंस बिश्नोई गँगने स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. चित्रपट निर्माते मुशीर आलम यांचे अपहरण दाऊदचा कट्टर दुश्मन पठाण गँगने केले होते. या गँगचे प्रमुख होते, आमीरजादा आणि आलमझेब. ही गँग त्या काळात दाऊदचा भावाची हत्या करुन चर्चेत होता. त्यांनी नेटवर्क वाढवण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे चित्रपट क्षेत्रातील मुशीर आलम यांनी उचलण्यात आले होते.

या मागची कहाणी रंजक आहे. ‘शोले’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर काहीच वर्षात डायरेक्टर रमेश सिप्पी यांनी आणखी एक ब्लॉकबस्टर आणला होता. चित्रपटाचे नाव होते शक्ती. या चित्रपटात त्या काळातील दोन दिग्गज अमिताभ आणि दिलीप कुमार एकसाथ पाहायला मिळणार म्हणून चित्रपट चाहत्यांमध्ये जल्लोष होता. या चित्रपटाचे निर्माते होते मुशीर आलम.
माजी एसीपी मधुकर झेंडे यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की चित्रपट शक्ती रिलीज होणार होता. त्याचे निर्माते मुशीर आलम याच्याकडे एक हरीश सुंगध नावाचा एक मॅनेजर होता. तो त्याकाळात आपल्याकडे २० लाख रुपयांचा काळा पैसा आहे असे तो सांगायचा. ही गोष्ट पठाण गँगकडे पोहचली. या गँगने १९८२ मध्ये दाऊदचा भावाची हत्या केल्याने ही गँग फूल जोमात होती.

मुशीर आलम याचे काय झाले ?

वरळीच्या चौकातून निर्माता मुशीर आलम याचे अपहरण करण्यात आले होते. मुशीर यांच्यासाठी हे तास त्रासाचे आणि तणावाचे होते.पठाण गँगच्या लोकांनी त्यांना जाम छळले होते. गँगचा प्रमुख अमीरजादा याने आम्हाला केवल २५ लाख हवेत असे त्यांना धमकावले होते. त्यांनी मुशीर यांच्या करवी त्यांचा साला आणि पार्टनर रियाझ यांना फोन लावला. त्याला जेवढे जमतील तेवढे पैसे घेऊन येण्यास सांगितले. रियाज आणि हरीश केवळ २.८० लाख जमा करु शकले. ते पैसे घेऊन घटनास्थळी पोहचले आणि मुशीर आलम यांना सोडण्यात आले.

अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या

मुशीर आलम यांच्या डोळ्यांना पट्ट्या असूनही त्यांनी अनेक नोंदी डोक्यात ठेवल्या. त्यांनी आजुबाजूला काय आवाज येत होते ते सर्व त्यांनी पोलिसांना सांगितले. २४ सप्टेंबर रोजी दिग्गज अभिनेता दिलीप कुमार मुशीर आलम आणि त्याचा मित्र रियाझ यांना घेऊन पोलीस आयुक्तांकडे पोहचले. सुरुवातीला मुशीर आलम काही बोलण्यास तयार नव्हते. मात्र, इसाक बागवान या धाडसी अधिकाऱ्यांनी या केसचा उलगडा करत अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us