AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धू मुसेवाला हत्येआधी म्हणाला होता, तुमची मुंबई किती सुरक्षित, गायक मिका सिंह याची ती पोस्ट व्हायरल

गायक मिका सिंग याची गायक सिद्धू मुसेवाला याच्यासोबत हत्येच्या आधी काही दिवसांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. त्यावेळी त्याने मुंबईतील सुरक्षित वातावरणाचे कौतूक केले होते.

सिद्धू मुसेवाला हत्येआधी म्हणाला होता, तुमची मुंबई किती सुरक्षित, गायक मिका सिंह याची ती पोस्ट व्हायरल
Mika Singh and late singer Sidhu Moosewa
| Updated on: Oct 19, 2026 | 10:12 PM
Share

बॉलीवूडचा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी जुहूत गोळीबार झाला आहे. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स डिसुझा गँगने घेतली आहे. या लॉरेन्स डिसुझा हा सध्या अहमदाबाद तरुंगात बंद असूनही त्याच्या इशाऱ्याने सिलिब्रिटींवर हल्ले होत आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याचीही हत्या झाली होती. या हत्येची जबाबदारी देखील लॉरेन्स डिसुझा गँगने स्वीकारली होती. या दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला याने गायक मिका सिंह याच्याकडे हत्येच्या आधी केलेल्या शेवटची चर्चा गायक मिका सिंह याने काही वर्षांपूर्वी मिडीयात सांगितली होती. आता हा चर्चा पुन्हा व्हायरल होत आहे.

एका मुलाखतीत गायक मिका सिंह याने सांगितले की दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला त्याच्या हत्येच्या काही दिवस आधी मुंबईत आले होते. त्यावेळी ते म्हणाले मुंबईत विना सुरक्षा तुम्ही फिरु शकता. सिद्धू मुसेवाला याला हत्येच्या आधी अनेकदा धमक्या आल्या होत्या.

सिद्धू मुसेवाला याने त्याला मिळत असलेल्या गुंडाच्या धमक्या संदर्भात माझ्याशी त्या शेवटच्या भेटीत चर्चा केली होती. काही गँगस्टर त्यांच्याकडून खंडणी वसुल करु इच्छीत होते.हत्येआधी मुसेवाला मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी माझ्याशी चर्चा करताना मुंबईत तुम्ही कोणत्याही सुरक्षेशिवाय फिरु शकता. त्यावेळी मी त्यांना तुम्हीही मुंबईत शिफ्ट व्हा असा सल्ला दिला होता. दुर्दैवाने त्यांची हत्या झाली असे गायक मिका सिंह यांनी म्हटले होते.

सिद्धू मुसेवाला खूप मोठे स्टार होते. त्यांनी केवळ तीनच वर्षातच त्यांचे नाव मोठे केले होते. पंजाबमध्ये नाही तर जगभरात त्यांचे चाहते पसरलेले आहेत. ते त्यांच्या गाण्यास सत्य मांडत असतात. काय प्रसिद्ध होणे हा गुन्हा आहे काय ? त्यांच्या गाण्यात एक वेगळाच एटीड्यूड असतो. परंतू सिद्धूत तो बिलकुल नसतो. पोलिस आणि सरकारने सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणाऱ्यांवर ठोस कारवाई करायला हवी अशी मागणी गायक मिका सिंग याने केली होती.

मिका सिंग याने गायक सिद्धू मुसेवाला यांच्या सोबतचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होती की मी नेहमी सांगतो की मला पंजाबी असण्यावर अभिमान आहे. परंतू मला ही गोष्ट सांगताना लाज वाटते की २८ वर्षांचा हा एक यंग टेलेंटेड मुलगा. जो एवढा प्रसिद्ध होता. त्याचे भविष्य उज्वल होते, परंतू पंजाबमध्ये पंजाबींनी त्याला मारले. भगवान त्यांच्या आत्म्याला शांती देओ. माझी प्रार्थना त्यांच्या कुटुंबियासोबत आहे. मी पंजाब सरकारला विनंती करतो की त्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. हे हृदय तोडणारे आहे.

सिद्धू मुसेवाला याची २९ मे २०२२ रोजी रविवारी गोळ्या घालून हत्या झाली होती. सिद्धू मुसेवाला हे याच वर्षी काँग्रेस पक्षातून विधानसभा निवडणूक लढली होती. बातम्यानुसार हत्येच्या एक दिवस आधी त्यांची सुरक्षा घटवण्यात आली होती. त्यांच्याकडे १० गनमॅन होते. परंतू मान सरकारने त्यांची संख्या कमी केली होती. पंजाब पोलिसांनी कॅनडा स्थित गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांना या हत्येला जबाबदार मानले आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष