ना शिल्पा, ना रवीना, ना ट्विंकल, या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होता अक्षय कुमार, कोण आहे ती?
ना शिल्पा, ना रवीना, ना ट्विंकल... बॉलिवूडमधील या अभिनेत्रीवर फिदा होता अभिनेता अक्षय कुमार, पत्नी ट्विंकलसमोरच स्वतः केला अभिनेत्याने खुलासा. कोण आहे ती अभिनेत्री?

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार सध्या दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘हैवान’ या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत आहेत. आपल्या दमदार अभिनयासोबतच अक्षय कुमार त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे. रवीना टंडन, शिल्पा शेट्टी यांसारख्या अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले होते. मात्र, ट्विंकल खन्नासोबत लग्न केल्यानंतर त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
पण अक्षय कुमारचा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण होता, हे तुम्हाला माहीत आहे का? या प्रश्नाचं उत्तर खुद्द अक्षय कुमारनेच एका मुलाखतीत दिलं होतं. विशेष म्हणजे त्याने हा खुलासा पत्नी ट्विंकल खन्नासमोर केला होता.
अक्षय कुमारचा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण?
करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी हजेरी लावली होती. यावेळी अक्षयला त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अक्षयने कोणताही आडपडदा न ठेवता दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या त्याच्या पहिल्या सेलिब्रिटी क्रश असल्याचं सांगितलं.
अक्षय कुमारने श्रीदेवी यांच्या सौंदर्याचा आणि अभिनयाचा आपण लहानपणापासूनच मोठा चाहता असल्याचं सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्याला श्रीदेवींसोबत काम करण्याची संधीही मिळाली होती.
‘मेरी बीवी का जवाब नहीं’मध्ये एकत्र काम
अक्षय कुमार आणि श्रीदेवी यांनी 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेरी बीवी का जवाब नहीं’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. पंकज पराशर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटात गुलशन ग्रोवर, अनुपम खेर, जॉनी लीव्हर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते.
करण जोहरने या चित्रपटाच्या रिलीजबाबत अक्षयला प्रश्न विचारला असता, अक्षयने चित्रपटाच्या शेवटाशी संबंधित एक भन्नाट किस्सा सांगितला होता.
18 वर्षांनंतर अक्षय-सैफची जोडी
दरम्यान, अक्षय कुमार सध्या ‘हैवान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या सस्पेन्स-थ्रिलरमध्ये अक्षयसोबत सैफ अली खान, श्रिया पिळगावकर आणि सैयामी खेर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अक्षय आणि सैफ यांची जोडी तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत असल्याने या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे.