AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुरंधरमुळे करोडोंची कमाई, आता यामी-आदित्यने मुंबई सोडली, हिमाचलमध्ये 100 वर्षे जुन्या घरात थाटला संसार!

Yami Gautam Aditya Dhar : धुरंधरच्या यशानंतर यामी गौतम आणि आदित्य धर यांनी मोठा निर्णय घेतला असून मुंबई सोडून हे जोडपं हिमाचलला स्थायिक झालं आहे.

धुरंधरमुळे करोडोंची कमाई, आता यामी-आदित्यने मुंबई सोडली, हिमाचलमध्ये 100 वर्षे जुन्या घरात थाटला संसार!
| Updated on: Oct 04, 2026 | 5:26 PM
Share

Yami Gautam And Aditya Dhar : ‘धुरंधर’च्या यशानं आदित्य धर आणि यामी गौतम यांचं आयुष्य बदललं आहे. पण,सर्वात मोठा बदल त्यांच्या घरात होणार आहे. मुंबई आता आदित्य धर आणि यामी गौतम यांचं कायमचं घर राहिलेलं नाही. यामी गौतम धर आणि चित्रपट निर्माता आदित्य धरनं हिमाचल प्रदेशला आपलं कायमचे निवासस्थान बनवलं आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे जन्मले ल्या ३७ वर्षीय यामीसाठी, हिमाचल प्रदेश हे केवळ भेट देण्याच्या ठिकाणापेक्षा खूप मौल्यवान आहे.

हिमाचलमध्ये १०० वर्षे जुनं घर विकत घेतलं

यामीचं हिमाचल प्रदेशशी घनिष्ठ नातं आहे आणि हे जोडपं मंडीतील गोहर येथे त्यांच्या प्रॉपर्टीच्या आसपास स्थायिक झाले आहेत. यामी गौतमचं हिमाचलशी असलेलं नातं खूप जुनं आहे. त्यांनी गोहरमध्ये २५ एकर जमिनीसह १०० वर्षे जुनं घर विकत घेतलं. लाकूड आणि दगडानं बांधलेल्या या मालमत्तेभोवती एक सेंद्रिय भाजीपाल्याची बाग असून तिथे यामी आणि आदित्य सफरचंद, बटाटे, आणि आलं पिकवतात. हे यामी आणि आदित्यसाठी केवळ सुट्टी घालवण्याचं घर नाही. यामी आणि आदित्य यांनी जून २०२१ मध्ये हिमाचलमधील याच ठिकाणी लग्न केलं, ज्यामुळे हे ठिकाण त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलं आहे. व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे अनेक वर्षांपासून मुंबई हेच त्यांचं घर होतं. ते खार वेस्टमधील एका मोठ्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते.

‘धुरंधर’च्या यशानंतर आदित्य धर प्रसिद्धीपासून दूर राहिला आहे. तो नुकताच गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिसला. ‘आर्टिकल ३७०’ साठी त्याला आणि यामीला सन्मानित करण्यात आलं. आदित्यला निर्माता म्हणून पुरस्कार मिळाला आणि यामीला तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला.

दरम्यान, आदित्य धर आणि यामी गौतम यांची एकत्रित संपत्ती अंदाजे १०० ते १२५ कोटी रुपये आहे. पण, ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ च्या यशानंतर हा आकडा वाढला असावा, कारण आदित्य हा या चित्रपटांचा सह-निर्माता देखील आहे. मात्र, रिपोर्टनुसार यामी गौतमचं नेट वर्थ ९० कोटी रुपये आहे. ‘उरी’ फेम आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता आदित्य धरचं नेटवर्थ २० कोटी ते ६० कोटी रुपये असल्याचा अंदाज होता.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात