कोरिओग्राफरच नव्हता, तरीही गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला नाचवलं; पडद्यामागचा हा किस्सा माहीत आहे?
हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मात्र, या गाण्यासाठी स्वतंत्र कोरिओग्राफर नेमण्यात आला नव्हता. अजय-अतुल यांचं संगीत, कलाकारांचा उत्स्फूर्त डान्स आणि हॉलिवूडमध्ये झालेलं संगीताचं रेकॉर्डिंग यामुळे हे गाणं प्रचंड फेमस झालं. आतापर्यंत या गाण्याला यूट्यूबर ५६३ मिलियन लोकाेनी पाहिलं आहे.

लग्नाची वरात असो, हळदीचा कार्यक्रम असो नाहीतर मित्रांची पार्टी… एक गाणं लागलं की अंगात आपोआप करंट येतो आणि पाय थिरकायला लागतात. २०१६ मध्ये एका सिनेमाने आणि त्यातल्या या खतरनाक गाण्याने फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर अख्ख्या देशाला या तालावर नाचायला लावलं. डान्सची गाणी रोजच येतात आणि जातात, पण या गाण्यात असं काय होतं की लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळेच झिंगून नाचत होते?
अजय-अतुलचं नादखुळा म्युझिक आणि आकाश-रिंकूचा एकदम बिंधास्त डान्स… याने सगळ्यांनाच वेड लावलं. पण यामागची खरी गंमत तुम्हाला माहितीये का? एवढ्या मोठ्या हिट गाण्याला चक्क कोणताच डान्स डायरेक्टर किंवा कोरिओग्राफर नव्हता. होय, गाणं वाजल्यावर जसा अंगात संचारतो आणि आपण बेभान होऊन नाचतो, तसाच हा डान्स होता. तोच मोकळेपणा प्रेक्षकांना एकदम भावला आणि हे गाणं बघताना प्रत्येकाला वाटायचं की यार, हा तर आपलाच डान्स आहे.
या सगळ्या झिंगाटपणाची खरी मजा तेव्हा येते, जेव्हा अजय-अतुलच्या आवाजातला तो रांगडा आवाज कानावर पडतो. होय, आपण बोलतोय ‘सैराट’ चित्रपटातल्या ‘झिंगाट’ या भन्नाट गाण्याबद्दल. या गाण्यामागची खरी हवा नुसती ठेक्यात नाही, तर थेट हॉलिवूडमध्ये दडलीय. अमेरिकेतल्या ‘सोनी स्कोअरिंग स्टेज’वर चक्क ६६ म्युझिशियन्ससोबत हे गाणं रेकॉर्ड झालं होतं. मराठी गाण्याची ही एवढी हवा बघून पुढे जान्हवी आणि ईशानच्या ‘धडक’ सिनेमासाठी हिंदीतही हेच गाणं वाजलं.
आज एवढी वर्षं झाली, तरी एखाद्या कार्यक्रमात ‘झिंगाट’ वाजलं की माहोल एकदम परफेक्ट होतो. जेनझीलाही ते तितकंच भारी वाटतं. ठरवून केलेल्या डान्सपेक्षा ती फुल एनर्जी आणि आपला नॅचरल अंदाज महत्त्वाचा असतो, हेच या गाण्याने दाखवून दिलं. या गाण्याला ५६३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
गाण्याचे बोल
उरात होतंय धडधड, लाली गालावर आली
अंगात भरलंय वारं, ही पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया
आणि तुझ्याचसाठी बनून मजनू मागून आलोया
उडतन्या बुंगाट, पळतया चिंगाट, रंगात आलया
झालं झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट
आता उतावीळ झालो, गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी इनिशल टॅटून गोंदलं
हात भरून आलोया, लय दुरून आलोया
आणि करून दाढी भारी परफ्यूम मारून आलोया
अगं समद्या पोरात, म्या लय जोरात रंगात आलोया
झालं झिंग झिंग, झिंग झिंग, झिंग झिंग झिंगाट