AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला जुळून येत आहे 7 विशेष महायोग, हा एक उपाय बनवू शकतो मालामाल

अक्षय्य तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, मुंडण करणे, नवीन व्यावसाय सुरू करणे इत्यादींसाठी एक शुभ दिवस आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते.

Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला जुळून येत आहे 7 विशेष महायोग, हा एक उपाय बनवू शकतो मालामाल
अक्षय तृतीयाImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 13, 2023 | 2:31 PM
Share

मुंबई : अक्षय तृतीया (Akshaya tritiya 2023) महापर्व हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी केलेले शुभ कार्य अक्षय फळ देते, म्हणून लोकं या दिवशी सोने-चांदी, घर-गाडी इत्यादी खरेदी करतात. अक्षय्य तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, मुंडण करणे, नवीन व्यावसाय सुरू करणे इत्यादींसाठी एक शुभ दिवस आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते. यावेळी 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. तसेच यावेळी अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ संयोग घडत आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.

अक्षय तृतीयेला शुभ योग

22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीयेला अर्धा डझनहून अधिक शुभ योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत उच्च असेल. तसेच सूर्याच्या मालकीचे कृतिका नक्षत्र राहील. याशिवाय अमृत सिद्धी योग, रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग, त्रिपुष्कर योग आणि आयुष्मान योग देखील अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तयार होत आहेत. अशाप्रकारे अनेक शुभ योग एकत्र करून केलेल्या महायोगात केलेले उपासना-उपाय व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

अक्षय तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त शनिवार, 22 एप्रिल रोजी सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 पर्यंत राहील. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा नियमानुसार करा. असे केल्याने अपार संपत्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

यासाठी अक्षय्य तृतीयेच्या पहाटे उठून स्नान करावे व नंतर पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर गंगाजलाने  अभिषेक करून ईशान्य दिशेला एक पद ठेवा. त्यावर पिवळ्या रंगाचे कापड पसरवा आणि नंतर भगवान विष्णू-माता लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. चांदीच्या भांड्यात गंगाजल घेऊन त्यात केशर टाकून चंदन तयार करा. त्यानंतर हे केशर चंदन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला लावा आणि नंतर उरलेले चंदन कपाळावर लावा. यानंतरही जर चंदन उरले असेल तर ते ठेवा आणि जेव्हाही तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाल तेव्हा कपाळावर याचा टिळा लावा. हे उपाय केल्यावर तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला खूप सुख, समृद्धी आणि प्रगती लाभेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट