लवकरच कलम 370 चा शालेय अभ्यासक्रमात समावेश होईल : जेपी नड्डा

कलम 370 (Article 370) हटवण्याच्या ऐतहासिक घटनेची तरुण पिढीला सविस्तर माहिती मिळावी यासाठी लवकरच शालेय अभ्यासक्रमात (Article 370 in syllabus) याचा समावेश करण्यात येईल

लवकरच कलम 370 चा शालेय अभ्यासक्रमात समावेश होईल : जेपी नड्डा
Follow us
| Updated on: Sep 24, 2019 | 9:00 AM

पुणे : कलम 370 (Article 370) हटवण्याच्या ऐतिहासिक घटनेची तरुण पिढीला सविस्तर माहिती मिळावी यासाठी लवकरच शालेय अभ्यासक्रमात (Article 370 in syllabus) याचा समावेश करण्यात येईल, असं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी सांगितले. पुणे येथील जन जागरण सभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

कलम 370 (Article 370) हटवण्याच्या ऐतिहासिक घटनेची तरुण पिढीला सविस्तर माहिती मिळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हे जाणून घेण्याची त्यांची रुची वाढणे गरजेचे आहे. त्यामुळं लवकरच शालेय अभ्यासक्रमात कलम 370 चा (Article 370 in syllabus) समावेश करण्यात येईल, असं भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले. त्याचबरोबर फुटीरतेला प्रोत्साहन देणाऱ्या बीजाचे समूळ उच्चाटन केल्याचं त्यांनी म्हटलंय.

सभागृहात हे बिल मंजूर करण्यात आमचा सहभाग होता हे आम्ही कधीच विसरु शकत नाही. तुम्ही मतदान केलेल्या खासदारांचाही सहभाग होता त्यामुळे हे आपलं भाग्य आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही कायद्यानं सर्वकाही सुरळीत झाल्यावर नॅशनल रजिस्टर फॉर सिटीझन लागू करु शकतो, असंही नड्डा म्हणाले. पुण्यातील या सभेत नड्डा यांनी कलम 370 हटवल्याने काय काय फायदा होईल यावरही मार्गदर्शन केलं.

दरम्यान, कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्यात आला आहे. देशातील इतर नागरिकांना ज्या सुविधा आणि लाभ मिळत होते, ते सर्व लाभही या नागरिकांना आता मिळतील. समानता वाढवण्यासाठी असलेल्या कायद्यांचा आता वापर होईल. शिक्षणाचा अधिकार मिळाल्यामुळे मुलांचं भविष्य आणखी उज्ज्वल होणार आहे. माहितीच्या अधिकारामुळे नागरिकांना सरकारच्या कामाबाबत माहिती मागण्याचा अधिकार मिळेल, असंही सरकारकडून मागे स्पष्ट करण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.